मुन्ना बदनाम हुआ..

संपादकांच्या परिषदेत मुन्ना आला. सर्वांना आपली ठरलेली ‘म्याऊ’ स्माईल देत सर्वांना अभिवादन केले. स्वतः खुर्चीवर बसल्यावर स्वतःच्याच हाताने स्वतःलाच चिमटा घेऊन पाहिले. सर्व संपादक अवाक होवून मुन्नाकडे पहात होते. मुन्नाने सर्वांकडे पुन्हा पाहून बसण्याची खुण केली. सर्व संपादक मंडळी खुर्चीत स्थानापन्न झाली. पहिला संपादकाने, ‘पंतप्रधानजी तुम्ही स्वतःचा चिमटा का काढला?’. प्रश्न ऐकताच मुन्नाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. Continue reading

Advertisements

मा. डॉ. मुन्नी सिंह यांचे आवाहन जसच्या तस्

राम जन्मभूमी – बाबरी मशीद शीर्षकाच्या दावाच्या उच्च न्यायालयाचा निकाल दि. ३०-९-२०१० रोजी अपेक्षित आहे. हा निकाल म्हणजे एका दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेचे निष्पन्न असेल. हे वेगळे सांगावे लागू नये की, सदर निकालाचा सर्वाधिक आदर केला गेला पाहिजे. हा निकाल झिडकारून द्यायला तुम्ही कृषिमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत. विसरलात का? तुमची शॉर्ट टर्म मेमरी झालीये. आमीर सारखी. चला मी आठवण करून देतो. मध्यंतरी, सर्वोच्च न्यायालयाने धान्य सडण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा असा आदेश काढला होता. आणि आम्ही तो आदेश ‘धुवे में उडा दिया’. Continue reading

इटलीची किटली

इटलीची किटली, युवराजला विमानात भेटली|
दिसताच युवराजच्या काळजात प्रेमाची आगच पेटली|
लगेचंच युवराजच्या प्रेमाची लावली तिने टिकली|
इटलीची किटली|| Continue reading

प्रतिज्ञा प्रत्येकाची

राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
मला दयेचा अर्ज केलेला आणि मला दयेचा अर्ज न केलेला फाशीचा हकदार
यांच्या फाशी रद्द करण्याची आणि त्यांच्यावर दया दाखवण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे। Continue reading

पंतप्रधानांची विशेष मुलाखत

नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर. Continue reading

त्या तिघी

एक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर काढतात. आणि इन्कम टॅक्सवाले संघ मालकांच्या घरावर धाडी टाकतात. जिच्या नवर्याचे नाव भोपाळ वायू दुर्घटनेतील मुख्य आरोपीला देशातून बाहेर सुखरूप नेण्यात येताच एका राज्याचा मुख्यमंत्री तो गुन्हा स्वत: केला असे सांगतो. जिच्या हातात सत्ता कायम असते. मग भाववाढ असो की देशात अतिरेकी हल्ले. Continue reading

काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’. दुसरे ‘गुलझारीलाल नंदा’, तिसरे ‘लाल बहादूर शास्त्री’, चौथ्या ‘इंदिरा गांधी’, पाचवे ‘मोरारजी देसाई’, सहावे ‘चरण सिंग’, सातवे ‘राजीव गांधी’, आठवे ‘विश्वनाथ प्रताप सिंग’, नववे ‘चंद्रशेखर सिंग’, दहावे ‘पीव्ही नरसिंहराव’, अकरावे ‘अटलबिहारी वाजपेयी’ हुशः काय यादी आहे. अजूनही एक नाव राहिलेच ‘इंद्रकुमार गुजराल’. आता नावात ‘र’ असलेला भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असा नियम नाही. पण एक दोन सोडले तर बाकीच्या पंतप्रधानांच्या नावात ‘र’ आहेच. Continue reading