भीमरूपी महारुद्रा

ही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते? मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं! कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली. Continue reading

Advertisements

कोरेगाव पार्क

आपण कोण आहोत? मुळात आपण आहोत का? काल जे घडल त्यावरून काय बोलाव तेच समजत नाही आहे. माझी यापूर्वीची कंपनी ज्या जर्मन बेकरीत घडला त्याच्या पुढच्या चौकात आहे. जा इमारतीत तो बॉम्ब फुटला, त्याच्या समोरच्या रस्त्याने मी अनेकदा गेलो आहे. खूप बेकार वाटत आहे. कोरेगावपार्क मधील माझ्या जुन्या कंपनीत मी दीडवर्ष होतो. जी लोक मारली गेली. जी जखमी झाली. ते आपले भाऊ होते. ज्या इमारतीत ती घटना घडली, म्हणजे ती जर्मन बेकारी पुण्यात खूप नावाजलेली आहे. आणि हेच कारण होत बॉम्ब स्फोट होण्याच. माझ्या मते ही घटना घडणार याचा पोलिसांना आणि आपल्या सरकारला पूर्ण माहिती होती. चार महिन्यापूर्वी तिथे पोलिसांनी एक चेकपोस्ट बनवले होते. आता तिथेच केले आणि आमचे पोलीस (‘पोलीस जवान’ शब्द आता पासून वापरणार नाही) पहारा देत होते. काय पहारा चालायचा हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. Continue reading