आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

Advertisements

राजीवस्थान

किती वाद घालणार आता! बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे? वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून  ‘फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा? याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का? . बर, दोन दिवसांपूर्वी दारिद्र्याच्या खालील लोकांसाठीची ‘लाभार्थी’ योजना आता ‘राजीव गांधी लाभार्थी योजना’ झाल्याची बातमी ऐकली का? आमच्या पुण्याचे आयटी पार्कचे नाव  ‘राजीव गांधी आयटी पार्क’ आहे. हे तर सोडा मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, चंदीगढ, बेंगलोरु, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मंगलोर, मोहाली, नोएडा, शिमला, तिरुअनंतपुरम्‌ आणि विशाखापट्टणम या सगळ्याचं आयटी पार्कची नावे ‘राजीव गांधी आयटी’ पार्क आहेत. गोवा राज्यातही होणार आहे म्हणे ‘राजीव गांधी आयटी पार्क’. बर ठीक आहे. संगणकाला यायला राजीव गांधी यांनी परवांगी दिली होती, म्हणून कदाचित आठवण म्हणून या सर्व आयटी पार्कची नावे ठेवली अस मानूया. Continue reading

पाणी पाणी रे

चार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास.  आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं. Continue reading

पुणेकरांचा संपर्क

काय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय? माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. Continue reading

पाल

एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे. Continue reading

चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही

आजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का? आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड? ते काही नाही, आजोबा शेजारच्यांनी भांडणार वगैरे काही नाही. Continue reading

रेल्वे

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका. Continue reading