डाळ

परवा चिंचवड गावात एका दुकानदाराला मसूर डाळीला पॉलिश करून ‘तुरडाळ’ म्हणून विकताना आरोग्य खात्याने पकडले. आता कारवाई होईल याची खात्री नाही. आता तुरडाळ किती महत्वाची हे सांगायला नको. एका बाईने ती तुरडाळ खरेदी करून घरी आली. धुतल्यावर त्याची पॉलिश निघून गेली. मग हा सारा प्रकार उघडकीस आला. असो, असं चिंचवडमध्ये सर्रास चालू आहे. याच आठवड्यात चिंचवड रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या पुलाखाली एका तरुणाला ठेचून मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह पहिला. सोडा, आता बघून काही वाटत नाही. महिन्यात एक घटना पुण्यात घडतीच. काल ‘पोलीस तपास करीत आहेत’ अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. सगळ्याच ठिकाणी असं घडत असत. त्यामुळे कोणालाच काही वाटत नाही. काल सकाळी रेल्वे स्टेशनवर येत असताना इथ निवडून आलेल्या बंडखोर उमेदवाराच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर चक्क दादांचा फोटो. Continue reading

Advertisements

राज इज बुलशेट

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’. Continue reading

टीसी

आज सकाळी लोकल चुकली. येताना लोकल वेळेवर आली. पण नेहमीप्रमाणे उशिरा निघाली. पुणे स्टेशन वरून निघायची वेळ सातची आणि निघाली सव्वा सातला. मी नेहमी येताना शेवटून दुसऱ्या डब्याच्या पहिल्या गेटवर असतो. महिन्याच्या अखेरच्या काही दिवस टीसी (तिकीट चेकर) आमच्या डब्यात तिकीट चेक करायला नक्की येतो. आता नक्की यासाठी म्हणतो कारण मी त्या डब्यात रोज असल्याने मला पक्क माहित झाल आहे. आणि कोण कोण टीसी आहे हे देखील माहित झाल आहे. त्यातील एक पंजाबी टीसी आहे. तो नेहमी डब्यात येत असतो. गोल चेहरा आणि चेहऱ्याप्रमाणेच शरीरयष्टी, पण धष्टपुष्ट.काळा रंगाचा कोट, भरदार दाढी- मिश्या आणि डोक्यावर पगडी. खर तर त्याच वर्णन करावा असाच आहे तो. एक वर्षापासून त्याला मी बघतो आहे. अनेक वेळा माझा लोकलचा पास चेक केला आहे. पण कधी बोलण वगैरे झाल नाही. Continue reading

पुण्याची लोकल म्हणजे कचरा गाडी

मागचा अख्खा आठवडा सात वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल साडेसातच्या आत पुणे स्टेशनवरून सुटली नाही. रोज लोक लेखी तक्रार करून देखील, लोकल काही वेळेवर येत नव्हती. शुक्रवारी रात्री तर कहरच. रेल्वेचे कर्मचारी तक्रार देखील लिहून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सगळे प्रवासी लोक त्यात मी देखील पुणेस्टेशन प्रबंधकाच्या केबिन मध्ये गेलो. सगळे फार चिडलेले होते. आम्हाला बघताच प्रबंधक साहेबांनी फोनाफोनी चालू केली. लोकल कुठे आहे? का अजून स्टेशन मध्ये अजून का नाही आलेली?. त्यांना तक्रार लिहून घेतली नाही कळताच त्या स्टेशन प्रबंधकाने त्या रेल्वे कर्मचाऱ्याला झापलं. खर तर मला त्याच्या झापून देखील समाधान होत नव्हत. मला वाटल होत की स्टेशनप्रबंधक ‘ अटल बिहारी’ असेल. पण तो मराठी होता. Continue reading

पुण्यात काहीही घडू शकते

पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. त्यातला अब्दुला वानवडीला तर मामून रैफ हिंजवडीला राहायला होता. त्यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखल्यापासून ते खोट्या पासपोर्ट पर्यंत सगळ जमवलं. आता पकडले गेले. पण पुण्यात काहीही घडू शकते. Continue reading