जेव्हा अडचणी येत असतात..

जेव्हा अडचणी येत असतात. आणि तुम्ही त्याच्याशी दोन हात करता. त्यावेळी काही वेळासाठी तुम्ही संपला असं तुम्हाला/आजूबाजूच्या लोकांना वाटत असते. काहीदा अडचणी येतच राहतात. काही काळ तुम्हाला गुंतवून ठेवतो. एक अडचण संपली की दुसरी. असे चक्र चालू राहते. पण माझ्या स्वानुभवरून तरी जेव्हा खूपच कठीण काळ येतो त्यावेळी समजून जा की चांगला काळ जवळ आलाय. Continue reading

Advertisements

सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी?

गेले काही दिवस हा प्रश्न राहून राहून मनात येतोय. आपण एखादी गोष्ट करतो. का? अस विचारल्यावर काहीतरी उत्तर नक्कीच असतं. म्हणजे, सकाळी उठल्यावर दात घासतो. का दात घासतो? अस विचारल्यावर, उत्तर पटकन येईल की, दात स्वच्छ राहावेत म्हणून. कंपनीत जाऊन काम कशाला करतो? उत्तर येईल पैसे कमावण्यासाठी. अशा एक न अनेक गोष्टी करतांना, त्यामागे कारण असते. पण आपण गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या का करतो? अस विचारल्यावर अस कुठलंच उत्तर मनात पटकन येत नाही. Continue reading

प्रश्न

प्रश्न हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रश्न निर्माण होतात. त्याच्या उकली सापडतांना जीवन वेगवेगळ्या अंगांनी बदलत जाते. बदल हा सृष्टीचा (न बदलणारा) नियम आहे. Continue reading

विषय लग्न

मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय? त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे. Continue reading

विषय

वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो. Continue reading

प्रश्न सुटला

कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील टेक्स्ट मला रीड करून राईट करायचे होते. कुठेही वर्ड किंवा नोटपॅडमध्ये. एक मायक्रोसॉफ्टचे एक बंडल सॉफ्टवेअर आहे. नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट इमेजिंग. Continue reading

भय इथले संपत नाही

काय रोज एक दिवस चालू आहे? एकदम झकास! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी. काल काही अप्सरा आली नाही. आणि दिवस एकदम बोर झाला होता. दुपारी जेवायची इच्छाच होत नव्हती. मग काय नाही जेवलो. दुपारी ‘चार’च्या दरम्यान आमच्या फ्लोरवर आमच्या कंपनीचे डॉक्टर आले. आणि या भल्या मोठ्या चोकोनातील सगळ्यांना एकत्र बोलावले. प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन फ्लू झाला आहे, अस सांगितले. त्यामुळे एकच गडबड सुरु झाली. डॉक्टरांनी काळजी घ्या, आणि त्यासाठी काय काय करायचे याच्या बर्याच गोष्टी सांगितल्या. अनेकांनी प्रश्न विचारले. आणि त्याची उत्तरे देखील त्यांना व्यवस्थित रित्या मिळाली. असो, याच दिवशी अप्सराला का सुट्टी घ्यावीशी वाटली? Continue reading