ती

कशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. Continue reading

Advertisements

इंश्योरेंस पॉलिसी

काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की यांना माझा मोबाइलचा क्रमांक कसा सापडतो हेच कळत नाही.  मध्यंतरी एका मुलीचा फ़ोन आला याचा इंश्योरेंस संदर्भात. Continue reading

तीर् नयनाचे

आताचा रविवार, परत आयुष्यात येऊ नये हीच प्रार्थना. या रविवार माझ्यावर किती वार, तीर् सोडले गेले असतील याची कल्पना तुम्हाला यावरूनच येऊ शकते की माझे मागचे पोस्ट आणि हे यातले वेळेचे अंतर. नेमक काय आणि कस घडल हे कळायला मार्गच नाही. सकाळी सकाळी तुम्हाला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो. तुम्ही तो फोन साखारझोप सोडून उचलता. पण फोनवर काहीच आवाज येत नाही. आणि तुम्ही मुर्ख सारखे हेलो हेलो करत बसता. Continue reading