लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?

काल रात्री लोकल चुकल्याने बसने आलो. त्यात नेहमीप्रमाणे एक प्रेमी युगल होते. नाही तरी पुण्यात असले प्रेमी युगलांची संख्या कुठे कमी आहे म्हणा. संध्याकाळी घरी आलो. आमच्या शेजारी एक नवीन जोडप आल आहे राहायला. त्यांना एक गोड बाळ पण आहे. आज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. नक्की काय होत आहे हे बघायसाठी मी बाहेर डोकावून बघितलं तर मारहाणीचा आणि कोणाचा तरी रडायचं आवाज येत होता. त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला असल्याने नक्की काय होत हे मला कळल नाही. पण एवढं नक्की त्या जोडप्यात वादावादी चालू होती. सकाळी लोकल मध्ये एकाने सांगितलं की त्यांच्या येथील एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याने बोलताना त्याची जुनी लफडी तिच्या बायकोला सांगितली. त्याच्या बायकोला वाटले की हा मोकळ्या मनाचा आहे म्हणून तिने देखील तीच जुन प्रेम प्रकरण त्याला सांगितलं. झाल ह्याने तिला घराबाहेरच काढल. Continue reading

Advertisements