ती ती आणि ती

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. Continue reading

Advertisements

एच आर

जसा दहशतवाद्यांना कोणताच धर्म नसतो. तसा क्रेडिटकार्ड वाले, पॉलिसीवाले, लोन वाले आणि हे एच आर वाल्यांनाही काही धर्म नसतो. मागे लागले की पिच्छा सोडतच नाही. जवळपास सगळ्याचं कंपन्यांत एच आर ‘मुली’च का असतात? हा प्रश्न कायम मला पडतो. आजकाल नवीन कंपनी शोधतो आहे, त्यामुळे दिवसातून किमान दोन चार फोन येतात. कामाचा एकही नसतो. कधी क्रेडीटकार्ड घ्या, तर कधी पॉलिसी आणि नाहीतर तर एच आर. सगळ्याचं पोरी. बापरे काय बोलतो आहे मी! ते सुद्धा आज. महात्मा फुले आज स्मृती दिन आहे. Continue reading

ती येते आणि..

दुपारपर्यंत तिची आठवणीने हाल हाल केले. आणि दुपारी ती आल्यावर, त्यापेक्षाही हालाहाल. काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती काय दिसते यार. दिसल्यावर अजूनच हालत खराब झाली. दुपारी कसबसे तीच्या डेस्कवर जायची हिम्मत करून निघालो. पण शेवटी व्हायचे तेच झाले. डेस्कजवळ गेल्यावर पुढे सरकायची हिम्मतच होईना. तीच्या बाजूच्या दुसऱ्या क्यूबमध्ये बसलेल्या माझ्या ओळखीच्या एपीएमच्या डेस्कवर जाऊन बोललो. नंतर खुपंच बेकार वाटायला लागले. साधे तीच्या डेस्कवर जाऊन मी बोलू शकत नाही. परवा ती माझ्या डेस्कजवळ आलेली. कदाचित माझ्याशी बोलायचे असेल. पण मी तिच्याकडे साधे मान वर करून पाहायची हिम्मत झाली नाही. काय होते यार, ती येते आणि मला घाम फुटतो. घसा, श्वास, हृदयनाथ सगळेच मला सोडून जावू लागतात. याला कसले प्रेम म्हणायचे यार? मी तिला भितो, हेच खरे आहे. Continue reading

मित्रास पत्र

प्रिय राहुल बाबास,
सा.न. वि.वि. मागील महिन्याच्या आठ सप्टेंबरला तुझा वाढदिवस होता ना! चल मला ते माहिती आहे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पोळा पाहिल्यावर पत्र टाकणार होतो. पण काय सांगू आजकाल माझ्या आयुष्यात खूप बदल घडतं आहेत. त्यामुळे नाही जमलं. मग तुला फोनच करणार होतो. पण मध्यंतरी तुझा ब्लॅकबेरी चोरीला गेल्याची बातमी वाचली होती. आणि मेल चेक करायला तुला वेळ कुठे असतो तुला? प्लास्टिकची घमेली उचलण्यात तू खूप बिझी असतो, अस पहिले टीव्हीवर मी. म्हणून मुद्दामहून पत्र टाकत आहे. मध्यंतरी तू पुण्यात आला होतास. म्हटलं असते तर भेटलो असतो. बर माझ सोड. आठ सप्टेंबरला काय बुवा एका मुलाची मज्जा झाली असणार! फुगे काय, घेरू काय आणि झूल काय, सगळंच छान. अगदी हॅंडसम दिसत असशील. तू काय बाबा, आधीच इतका गोरा गोमटा. त्यात हे सगळ् पाहून गायीच काय म्हशी सुद्धा चेकाळल्या असतील. तुझे पराक्रम तर जगविख्यात आहे. Continue reading

‘मिशी’ची हत्या

सांगतांना खूप वाईट वाटते आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या ‘मिशी’ची हत्या झाली. आणि आता तीच्या पुनर्जन्माची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे झाले असे. दाढी करतांना एक दोनदा माझ्या मिशीवर मी एक बाजूला ‘चुकून’ कापली गेली. सेट करण्यासाठी दुसऱ्या बाजूची देखील कापावी लागली. मग ती कमी होत होत ‘शत्रुघ्न सिन्हा’ची झाली. अजून थोडी कमी झाली असती तर ‘दबंग’ झालो असतो. माझ्या इमारतीत असलेल्या केशकर्तनालयात शुक्रवारी केस कापायला गेलो असता. त्या न्हाव्याने तिची हत्या करून टाकली. केस कापून झाल्यावर त्याला दाढी सुद्धा करून टाक म्हणालो. आणि त्याने माझी मिशी अशी का विचारल्यावर मी त्याला ‘चुकून’ झालेली चूक सांगितली. Continue reading

सख्खे

आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून चहा प्यायला जाऊयात म्हणून त्याचा आग्रह. बर, मी पण त्यावेळी वेडाच! लगेचंच. मग चहाच्या टपरीवर गेलो की, तो मला ‘दोन रुपये सुट्टे आहे का?’ अस विचारणार. मी बसने जा ये करायचो. त्यामुळे सुट्टे पैसे असायचे. आई वडिलांनी थोडे फार तरी खोटे बोलायला शिकवले असते तर किती बरे झाले असते. मी पैसे काढून द्यायचो. आणि त्याची तो एक सिगारेट खरेदी करायचा. Continue reading

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading