बोनस

आमच्या कंपनीत यावेळी बोनस काही होणार नाही. दिवाळी आणि दसरा हे सण जसे धार्मिक महत्व असते तसे आर्थिक देखील असते. दसऱ्याला घरी गेलो होतो. माझ्या लहान भावाला दसऱ्याला बोनस मिळाला. त्याबरोबर मिठाईचा बॉक्स देखील. स्वारी भलतीच खुश होती. आल्या आल्या विचारलं आईने ‘बोनस कधी मिळणार?’. आता हा प्रश्न याआधी काका, काकू, ‘ती’ ची आई, बहिण अशा सगळ्यांनीच विचारला होता. आणि सगळ्यांना दिलं तेच उत्तर मी आईला दिलं ‘यावेळी मिळल अस काही वाटत नाही’. मित्राचा आज इमेल आला होता. त्यात ‘हे सगळे बोनसची वाट पाहत आहेत, आणि तुम्ही?’, आणि खाली दहा पंधरा लाल रंगाच्या माकडांचा ग्रुप फोटो होता. पाहून त्याच्या देखील कंपनीत यावेळी बोनस नाही हे मी समजलो. Continue reading

Advertisements

लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो. Continue reading

साडेसाती

माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. Continue reading