एक थी मांजर

एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या  भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. Continue reading

Advertisements

जय बिहार

बस अजून काही दिवस, मग हेच ‘जय बिहार’ म्हणावे लागेल. नाहीतरी ‘जय’ बिहारकडेच उरला आहे. आमच्याकडील ‘यशवंतांना’ जिवंत जाळले जाते. एका व्यक्तीला भर दिवसा जिवंत जाळले जाते. मारणारा कोण? ज्याला तडीपार केले आहे तो. पुण्यात महिन्याकाठी एक तरी रेप केस होते. तिथेही गुन्हेगाराची बाजू कोण घेत? तर आमचे माननीय आमदार साहेब. तडीपारी रद्द करायला डायरेक्ट मंत्रालयापर्यंत मजल. आमचे मुख्यमंत्री ‘आदर्श’ निर्माण करतात. कृषिमंत्री वाईन गाळत बसतात. ‘जातिवंत’ उपमुख्यमंत्री जमिनींचे व्यवहार करतात. नदीत आणि ओढ्यात भर टाकून जमिनी विकतात. Continue reading

बोललो

हुश्श!!! बोललो एकदाचा. किती छान हसते ती. माझा श्वास नॉर्मल होताच नाही आहे. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू! नाचावस वाटत आहे. झाली हिम्मत एकदाची! किती सुंदर आहे. काय करू यार आता. काल संध्याकाळी बिग बझारमध्ये दोन तासाचा काही तरी फायदा झाला. बूट पासून शर्ट नवीन घेतले. निवडतांना दर दहा मिनिटांनी माझी निवड बदलायची. तिला कोणता ड्रेस आवडेल? याचा विचार करून डोक हैराण झाल होत. आता डोक दुखायचे बंद झाले आहे. Continue reading

कला

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. Continue reading

आकारमान

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. या एप्रिलमध्ये केले तेव्हा ७५ किलो झाले. माझे मित्र वस्तुमान बघून दिसत नसलेले पोट धरून हसत होते. Continue reading

पंतप्रधानांची विशेष मुलाखत

नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर. Continue reading

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading