गुरु पोर्णिमा

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट देणार आहेत अस ऐकायला मिळालं आहे. Continue reading

Advertisements

जाणता लाजा

राजे आवेशात म्हणाले ‘आम्ही बिल्लीचा तख्त जिंकला. आता आम्ही या देशाचे लाजे झालो’. अस म्हटल्या म्हटल्या राजांचा पुतण्या धावत येऊन महाराजांना ‘राजे, उठा’. राजांचे डोळे उघडले. आणि पाहतात तर राजे अंथरुणात. राजे मोठ्याने म्हणाले ‘आम्हाला कोणी इथे आनले?, बोल रे हारजीत आम्ही कुथे आहोत?’. ‘बारामतीच्या गडावर’ पुतण्या हारजीत उत्तरला. तेवढ्यात कोणी तरी दासी आली आणि म्हणाली ‘महाराज, आपल्याला बडी बेगमने याद केले आहे’. हे ऐकल्या बरोबर महाराज घाईघाईने कमरेची गुढघाभर लांब बाहेर आलेली नाडी आत खोचत ‘आलो आलो’ म्हणाले. तेवढ्यात तिकडून सुलेबाई ‘अहो, निदान सदरा तरी घाला’. महाराज म्हणाले ‘अरे हो, विसरलोच. अरे छगन, दे रे तुझा!’ छगनराव नाईक लाजले ‘आम्ही नाही जा!!!’. राजे त्यांच्या स्पष्ट भाषेत म्हणाले ‘अले, आता देना. नाही तरी तकडे गेल्यावर ती माझी उतरवरानारच आहे’. छगनराव नाईकांनी ताबडतोप आपला सदरा काढून राजांना देतात. राजे सदरा घालतांना मोठ्या आवाजात ‘आता तू जर नीट दिला नसता, तर राडा केला असता’. Continue reading

बडी बेगम

परवा म्हणे दरबार भरला होता. मलिका ए हिंदोस्तान बडी बेगम त्यावेळी रयतेवर चिडल्या. ‘काय लावलाय महागाई आणि कर वाढ? कधी बघावे त्यावरच रयतेच रडण आपल चालूच. काय दुसरा धंदा आहे की नाही?’ सगळे सरदार जमा झाले होते. प्रत्येकाने आपआपले अर्ज दरबारात सादर केले. आता बाकी काही नाही ना म्हणून अर्ज. मग बडी बेगमने त्यांच्या शुद्ध आणि स्पष्ट भाषेत सगळ्यांना आदेश दिला की जा आणि माझ्या रयतेला सांगा की ‘हे सगळ कोणासाठी चालल आहे?’ एकाने मध्येच ‘पंजासाठी’. मग मलिका ए हिंदोस्ता आणखीन भडकल्या ‘अरे फुलांनो, आम रयतेसाठी चालल आहे’. अस म्हटल्यावर सगळ्या सरदारांनी मान डोलावून होकार दिला. पुढे बडी बेगम म्हणाल्या ‘आम्ही काय नाही केल? बॉम्बस्फोट काय असतो. कसा असतो. कधी बघितला होता काय? आम्ही तुम्हाला ‘होम डिलीव्हरी’ दिली. अतिरेकी कसा असतो. हे कधी उघड्या डोळयांनी पाहिलं होत का? त्याचा चेहरा कधी पहिला होता का? बघा आमच कसब.’ Continue reading