येजा वू

काय करू यार? देवाने माझ्या चित्रपटात तेच तेच सीन का टाकले तेच कळत नाही. बर ह्या विषयावर, मी खूप बोलायचे टाळत होतो. पण आज इतक्यांदा घडलं ना! सकाळी लवकर उठायचे ठरवून देखील आज मी उशिरा उठलो. आधीच खूप गोरा होता. दोन दिवस उन्हात भटकल्यामुळे आणखीन गोरा झालो. लेट मॉर्निंगची बससाठी सुद्धा धावपळ झाली. देवपूजा नाही झाली आज. बस स्टॉप गेलो तर ‘परीवहिनी’. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे दिसतातच. त्यांना विचारलं ‘बस गेली नाही ना अजून’. तर त्यांनी हसून ‘नाही’ म्हणाल्या. त्या गप्पा मारायच्या रंगात होत्या. असो, मी ‘टाळले’. मग पुन्हा एकदा, त्यांना पहिले तर त्या आपल्या हसरा चेहरा करून माझ्याकडे पहात होत्या. मग हे आधी कुठे तरी पहिले अस वाटायला लागले. बसमध्ये बसल्यावर, मी मुंबईला असतांना हे असल् ‘अर्धवट’, ‘अर्थहीन’ स्वप्न पडलेलं आठवलं. Continue reading

Advertisements

दिवाना

चित्रपटाचा नायक आनंदात सकाळी कंपनीच्या बसने कंपनीत चाललेला असतो. पावसाच्या सरीने वातावरण अधिकच रोमेंटिक बनवले असते. त्यात नायक नायिकेच्या आठवणीत, तिला भेटण्याची त्याची इच्छा. खुपचं अधीर झाला असतो तो. तिच्यासाठी तो ‘दिवाना’ झालेला असतो. कंपनीत पोहचल्यावर, त्याच्या डोक्यात आज नायिकेशी कस बोलावं अगदी, तिला काय म्हणावं असे सगळे विचार त्याला गोंधळून टाकत असतात. कंपनीत आल्यापासून त्याला तिची आठवण इतकी सतावत असते की सारखा सारखा तिच्या बसण्याच्या जागी दर पाच दहा मिनिटांनी पाहत असतो. पण नायिका काही येत नाही. Continue reading

बेकार दुपार

काय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या. Continue reading

ऊऊउऊऊ…

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी पाहून चालक देखील बस न्यायला तयार होईना. Continue reading

आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

लाच

मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली आणि त्या पोलिसाला दिली. पोलिसाने पैसे खिशात टाकले. मला वाटलं की, आता पोलीस त्याला पावती देईल. पण नाही. Continue reading

परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. Continue reading