डियर

नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने मला गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. विचारांनी डोके पकवून टाकलेले. त्यात हे सल्ले. काय म्हणतात त्याला ‘वॉट अन् आयडिया’. Continue reading

Advertisements

माझ्यासाठी

आला एकदाचा सोमवार. दोन दिवस दोन वर्षाप्रमाणे वाटले. अरे सांगायचे राहूनच गेले, रविवारी मला नेटवर अप्सराचा एक फोटो मिळाला. किती छान दिसते ती! रविवार दिवसभर तिच्या फोटोचाच अभ्यास केला. बस! बहिणाबाईला तो फोटो मेसेज केला. तिलाही ती खूप आवडली. उगाचंच बहिणाबाई, मला ‘नाय’ नाय करत होती. चला आता माझ्या घरून नकार होणार नाही. नाहीतरी अप्सरा इतकी छान आहे की, नकार होवूच शकत नाही. कालच मी माझ्या इमारतीच्या बिल्डरला फोन केला होता. आज संध्याकाळी जाणार आहे त्याच्या नवीन साईटवर. आता माझे घर आहे ना! ते दोन खोल्यांचे आहे. चारशे स्क़ेअर फुट. ठीक आहे. Continue reading

माझी प्रतिक्रिया

मी माफी मागतो, मला येणाऱ्या प्रतिक्रियांना काहीच उत्तर देत नाही म्हणून. मी प्रतिक्रिया न देण्यामागे, मी फार मोठा किंवा वेळच नसतो अस काहीच नाही. उलट तुम्ही माझ्याशी बोलता. खूप चांगल वाटत. आनंद वाटतो. मलाही समजून घेणारे मित्र असल्याचा आनंद, निराळा आहे. मला येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आदर्श आणि मार्गदर्शक असतात. मी माझ्या मित्रांशी या विषयावर गप्पा मारल्या तर ते ‘बोर’ करू नको असे म्हणतात. Continue reading

इति ‘अप्सरा’ कृपा

आज किती छान दिसते आहे. मला ना आजकाल दुसरे काहीच सुचत नाही आहे. कालही असेच, तिच्याशी बोलायचे म्हणून कंपनीच्या इमारतीच्या तीन मजले पळत आलो. आणि आज सकाळी पळायला गेलो तेव्हा इतके पाय ठणकायला लागले ना! पण काही नाही, व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला आणि दुखायचे बंद. दाढी करतांना दोन तीन ठिकाणी कापलं. पण लक्षात आले नाही. बसमध्ये बसल्यावर एका मित्राने सांगितल्यावर लक्षात आले. Continue reading

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading

ती कशी असेल?

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते. Continue reading

नाही

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना! Continue reading