माणुसकी

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading

Advertisements

मित्र

परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. Continue reading

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. Continue reading

मुली आणि मोबाईल

या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही होत तेवढ्यात समोरच्या मुलीच ते ‘कार्ट’ किंचाळल. Continue reading

उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो. Continue reading

काय बोलू?

यार हा लग्न विषय ना पिच्छा सोडत नाही आहे. जो बघाल तो माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रतिक्रियेतून हाच प्रश्न विचारला होता. गेल्या महिन्यापासून हेच चालू आहे. माझ्या इमारतीतील सगळे कधीही भेटले की हाच प्रश्न. आणि माझ लग्न खर बोलायचं झालं तर मोडल. आता ह्याच दु:ख माझ्यापेक्षा माझ्या नातेवाईकांनाच जास्त झाल्याची शंका येत आहे. मध्यंतरी माझ्या कोकणातील काकूचा फोन आला. तिने मला ‘लग्नाचे कुठपर्यंत आले?’ असा प्रश्न केला. मी म्हटलं की ‘केंसल झालं’. पुन्हा ‘का?’ विचारल्यावर मी खर काय ते सांगितलं. Continue reading