शतक

आजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते. Continue reading

Advertisements

तो आणि ती

तो शांत. ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. आणि ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. आणि ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. आणि त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार. Continue reading

हेल्मेट

गेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत हेल्मेट. पण चला ठीक आहे. ते हेल्मेट डोक्यात घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे केस, पॅंट आणि बूट काळे. Continue reading

बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईकची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. Continue reading

योगायोग?

काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. Continue reading

इच्छा

इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती गोष्ट वेगळी की, तो विकत घेण्याची ताकद माझ्यात होती. ती माझी जीवनातील पहिली इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धा लाख मोजावे लागले. Continue reading

हेडफोन

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत. Continue reading