चिल्लर पार्टी

संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण त्याच्या वर्तनाने वाटणार नाही. त्याने मला त्याच्या खोलीतील संगणक कसा चालू करायचा ते सांगितले. नंतर गेमची सीडी कशी टाकायची आणि त्याचे ते रंग भरण्याचे खेळ कसे खेळायचे हे दाखवले. बर त्याच असं, मी एक गेम खेळणार आणि मग तू एक गेम खेळायलाच हवा. मग काय ते रंग भरण्याचे खेळ मलाही त्याने खेळायला लावले. Continue reading

Advertisements

म्हणे मी अकौंट चेक करतो

सहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो की काय देव जाणे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. बर माझी पायलीची पन्नास अकौंट आहेत. बर तीच चेक करायला मला जमत नाही. आणि ही सांगते मी तीच चेक करत बसलो होतो. Continue reading

रेशनकार्ड

रेशनकार्डसाठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिसमध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे अस सांगून प्रत्येकाला टाळत होती. बर जी काम करत होती. ती काम करण्यापेक्षा अधिक चीड चीड करत होती. मी तिला माझ्याकडील पावती दाखवली आणि विचारलं की ‘इथ कोणाला विचारायचं नवीन रेशनकार्ड बद्दल?’ ती न नुसताच पाच एक मिनिट ती पावती पाहत राहिली. काही उत्तर न देता परत ती पावती परत दिले. Continue reading