चाकरी

‘चाकरी’ आणि ‘गुलामी’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य वाटेल! परंतु सत्य हेच आहे. पूर्वीच्या काळी धनाढ्य लोक त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ‘गुलाम’ खरेदी केले जात. खरेदी केलेला ‘गुलाम’ हा माणूसच असे. परंतु त्याने आपला ‘मालकाची’ सर्व कामे. त्याच्या इच्छेनुसार कराव्या लागे. मालकाची वर्तणूक कशीही असो. त्याने कितीही अत्याचार, अन्याय किंवा अपमान करो. ‘गुलाम’ माणसाला त्या सोसावेच लागे. मालक जे देईल (देईलच अशी शाश्वती नाही) ते खायचे. मालक म्हणेल तीच ‘पूर्व’. Continue reading

Advertisements

आयटीतील म्हणी

  • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
  • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
  • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
  • रात्र थोडी टास्क फार. Continue reading

द बॉस

जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो. Continue reading

सांगू??

काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, अशी नाटके. यार माझा डीएम जाम नाटकी आहे. अजून तीन वर्ष थांब आणि तुझे शिक्षण कर. मग मी तुला पे रोलवर घेतो. अस म्हणत होता. Continue reading

वाट लावा

काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ‘बॉस’ लवकरात लवकर देतो असं म्हणाले होते. पण नंतर पूज्य दोन तीन महिने कुठल्या समाधित्त मग्न झाले, देव जाणे. Continue reading

वशिला

कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. मी तुझ्याकडे राहतो. कारण पैश्यांचा अडचण आहे. आणि तूच तुझ्या कंपनीत माझ्यासाठी जॉब बघ’. कसाबसा पिच्छा सोडवला. Continue reading

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. Continue reading