भगवंताची उणीव

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची.

साधनेत भगवंत भेटीचा आनंद मिळतो. तरीही भगवंत भेटीची ओढ कायम राहते. हा जीव त्या भगवंतासाठी आसुसलेला आहे. कर्तव्याचे पालन करतांना नामस्मरण चालूच असते. भक्तीमध्ये लीन होवून या भवसागरातून तरून जाण्याचा खटाटोप.

Advertisements

फिल्मी भक्ती

सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान  साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो. Continue reading