अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. Continue reading

Advertisements

पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?

राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता. Continue reading

पुण्यातील स्वाइन फ्लू

स्वाइन फ्लू ने पूणेकरांची झोपच उडवली आहे. सिंबायोसिस कॉलेजच्या सेनापती बापट रोड कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एका विद्याथिर्नीला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल आल्यामुळे हा कॅम्पस १३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रिय स्वाश स्पर्धा पुढे ढकलंन्यात आली आहे. अनेक शाळा पुढे हाच प्रश्न उभा ठाकला आहे. मास्क घेउन कितपत फायदा होइल याची काही कल्पना नाही. एकुणच परिस्थिती काही चांगली नाही. कोणी नुसता शिंकला तरी लोक त्याच्याकडे भीतीने बघतात. रस्त्यावरून चालताना मास्क घातलेले लोक बघितले की जैन लोकांची फेरी निघाली आहे की काय अशी शंका येते. Continue reading