टिपीकल

चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा काहीही न बोलता आपला निर्णय बदलतो. आणि आईने सांगितलेले कपडे निमुटपणे घालतो. तयारी चालूच असते, तर मुलीच्या वडिलांचे आगमन होते. Continue reading

Advertisements

माणुसकी

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading

उपास

सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही फरक पडणार नाही. असा शेरा देखील मारून टाकला. दुसऱ्याने तर, उपास केल्याने मुली भेटत नसतात अस देखील म्हणाला. तरीही माझा निर्णय ठाम ठेवला. आणि कॅन्टीनमध्ये शिरलो. Continue reading

कुटुंब

हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की प्रत्येक गोष्ट विस्तृत बोलायची झाल्यास एखादे ‘ईबुक’ बनून जाईल. काही खूप छान घटना घडल्या तर काही खुपंच मनाला बोचणाऱ्या. Continue reading

हिंदुत्व

दोन दिवसांपूर्वी त्या याहूवर चाटींग वर एक ‘गे’ भेटला होता. अल्स विचारल्यावर त्याला म्हटलं ‘मी मुलगी नाही रे’. आणि कुठून म्हटलं अस करून टाकल. कसाबसा पिच्छा सोडवून घेतला. नाही तरी आता काय म्हणतात ‘कायदा’ केला आहे त्यांच्यासाठी. परवा आपल्या सर्वोच्य न्यायालयाने असंच आणखीन एक ‘लिव्हींग रिलेशनशिप’ला मान्यता दिली. माझ्या मागील कंपनीत एक ‘लिव्हिंग रिलेशनशिप’वाली होती. आता तीचा तो बॉयफ्रेंडचे हे दुसरे ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ होते आणि तिचा हा पाचवा ‘बॉयफ्रेंड’ कम पहिला ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ पार्टनर होता. चांगल आहे. ऐकल्यावर दोन दिवस काय सुचलंच नाही. पण आता हे सर्रास चालत. Continue reading

राशी आणि स्वभाव

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. Continue reading