माझा अखंड महाराष्ट्र

काही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.

Continue reading

Advertisements

माऊवादी

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. सर्वात जास्त बायका करणारा हाच तो नरश्रेष्ठ. नुसत्याच केल्या नाहीत तर नंतर त्यांना मारून टाकले. बघा! नाहीतर तो तुमचा श्रीराम. आत्ताच दोन दिवसांपूर्वी ते लिंबूसरबतंम् येऊन गेले. आम्हाला लाल कपड्यात बघितल्यावर, ते लिंबूसरबतंम् लूंगी सोडण्याची भाषा करायला लागले. Continue reading

गाव

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. गाव लहान असेल तरी तीस हजाराची लोकवस्ती आहे. घरी पुन्हा येताना शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नवीन पाट्या बघितल्या. गावात आजकाल राजकारण जोरात आहे. दरवर्षीप्रमाणे ‘रामायण’ या विषयावर सप्ताह चालू झालेला आहे. गाव जरा जास्तच धार्मिक आहे. माझे वडील आई आणि जवळपास संपूर्ण गावच संध्याकाळी सप्ताहात असते. रात्री वीज राहिल्याने मुळा प्रवरा वीज मंडळाचे उपकार मानले. Continue reading

बोलावे तसे चालावे

मध्यंतरी टाइम्स नाऊवरची राज ठाकरेंची मुलाखत बघितली. ते म्हणतात ना ‘बोलवे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले’. तस आहे अगदी. देशभरात सिगारेटवर बंदी आहे. पण अजून देखील अनेक ठिकाणी ‘धुम्रपान बंदी’ असे फलक लावलेले आहेत. कारण सरकारच्या बंदीवर कोणाचा विश्वास नाही. शरद पवार खूप काही बोलतात. पण ते जे बोलतात ते किती पाळतात? विदेशीचा मुद्धा घेऊन पक्ष स्थापन केला. आणि आता त्याच कॉंग्रेस सरकारच्या सरकारेत मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई मध्ये पंतप्रधान आले होते. ७६५ कोटींची घोषणा वगैरे झाली. अजून पर्यंत एक रुपया देखील आला नाही दिल्लीतून. Continue reading

पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?

राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता. Continue reading