बंदी आणाच

काय चुकलं ‘बाबा’ आणि ‘मन्या सवारी’चे? संघावर बंदी असायलाच हवी. मी तर म्हणतो, अभिनव भारतवर सुद्धा बंदी असायला हवी. इंग्रजांच्या राज्यात तर होतीच. त्याचबरोबर शिवसेनेवर देखील बंदी आणा. दहशतवादी संघटना आहेत ह्या सर्व. शिवसेनेची तर दहशत तर अख्या महाराष्ट्रभर आहे. विश्व हिंदू परिषद वाले आणि बजरंग दलवाले सुद्धा काही कमी नाहीत. त्यांच्यावर सुद्धा बंदी आणायला हवी. म्हणजे आपला देश खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ होईल. नाहीतर ह्या सगळ्या दहशतवादी संघटना देशाला पोखरून टाकतील. देशाचे किती मोठे नुकसान आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्यावर बंदी आणावी. आणि त्यासोबत सिमी आणि इंडियन मुजाहिदीन सारख्या खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ संघटनांवरील बंदी उठवून अनुदान चालू करावे. त्यामुळे देशात होणारे हल्ले थांबतील. कस वाटत? Continue reading

Advertisements

वादविवादस्थान

काय मजेदार देश आहे आपला, इथे जन्मापासून मरेपर्यंत सगळीकडे वादच वाद. ‘शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?’ याचा वाद. त्याचे गुरु कोण यावर देखील वाद. एवढे तरी बर की ‘आई’ कोण यावरून वाद नाहीत. अरे, आजचा खरा खुरा ‘शोले’ राममंदिर.. त्यावर सुद्धा वाद. देवाला सुद्धा नाही सोडले. मुंबई कोणाची? यावर सुद्धा वाद. मुळात देश ‘निधर्मी’ की ‘हिंदूराष्ट्र’ यावर सुद्धा वाद आहेच म्हणा. अरे हिंदुस्थान की भारत की इंडिया यावर देखील वाद चालूच आहे म्हणा. राष्ट्रभाषा नाही. पण त्यावरून देखील वाद. सरदार सरोवरच्या बंधाऱ्याची उंची वाढवण्यावरून वाद, कश्मीरमध्ये तर सगळेच वाद. बिचारे जम्मू आणि लडाखवाले. नक्षली उंदरावर सैन्याचा फवारा मारायचा का त्यावर देखील वाद. महिला आरक्षण द्यायचे की नाही त्यावर देखील वाद. Continue reading

आजींचे भाषण जसच्या तस्

माझ्या प्रिय देशवासीयांनो,
चौसष्ठाव्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्व संध्येला मी भारतात आणि विदेशात राहणाऱ्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि मी विशेषतः आपल्या सीमांचे रक्षण करीत असलेल्या सशस्त्र सेनेचे आणि आणि अर्ध सैनिक दलाचे वीर जवानांसोबत केंद्रीय तसेच राज्य स्तर पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा बलाचे अभिनंदन करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करते, ज्यांच्या कठोर मेहनतीने, उत्पादन कौशल्याने आणि उद्यमशीलतेमुळे भारताला विश्वातील प्रमुख देशांत सामील केले आहे. सरकारमुळे नव्हे. मी मध्यंतरीच, लेहमध्ये घडलेल्या घटनेत प्रियजनांना गमावलेल्या, घायाळ झालेल्या तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना हार्दिक संवेदना व्यक्त करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. Continue reading

रद्दताई पाटील

कोणीही चिडायचे नाही आता! आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना! एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी? आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना! Continue reading

मजेदार भाषांतर

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो. Continue reading

भगवा

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा विजयी’. Continue reading

राजीवस्थान

किती वाद घालणार आता! बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे? वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून  ‘फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा? याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का? . बर, दोन दिवसांपूर्वी दारिद्र्याच्या खालील लोकांसाठीची ‘लाभार्थी’ योजना आता ‘राजीव गांधी लाभार्थी योजना’ झाल्याची बातमी ऐकली का? आमच्या पुण्याचे आयटी पार्कचे नाव  ‘राजीव गांधी आयटी पार्क’ आहे. हे तर सोडा मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, चंदीगढ, बेंगलोरु, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मंगलोर, मोहाली, नोएडा, शिमला, तिरुअनंतपुरम्‌ आणि विशाखापट्टणम या सगळ्याचं आयटी पार्कची नावे ‘राजीव गांधी आयटी’ पार्क आहेत. गोवा राज्यातही होणार आहे म्हणे ‘राजीव गांधी आयटी पार्क’. बर ठीक आहे. संगणकाला यायला राजीव गांधी यांनी परवांगी दिली होती, म्हणून कदाचित आठवण म्हणून या सर्व आयटी पार्कची नावे ठेवली अस मानूया. Continue reading