स्वरूप पहा

काल माझ्या एका परम मित्राने मला एक इमेल पाठवला. त्यात दोन छायाचित्र आहेत. एकात मनसेचे उर्दूत पोस्टर आहे. आणि दुसऱ्यात मनसेचा एक उमेदवार युपी भैय्याकडे मतासाठी हिंदीत बोलत आहे. इमेलच्या सुरवातीलाच ‘फ़क्त मुस्लिमांच्या मतांसाठी उर्दू भाषेत पोस्टर लावले. मुस्लिमाना मराठी समजते मग कशाला ही नाटके….? हेच का तुमचे मराठी प्रेम………?‘ अस लिहिलं आहे. बघून खरच दुख झाले. पण आपण त्या विषयावर नंतर बोलू. माझा जो मित्र आहे. म्हणजे ज्याने हा इमेल पाठवला. याचा इतिहास आपण आधी बघू. याने अजूनपर्यंत कधी मतदान केलेलं नाही. मागील लोकसभेच्या निवडनुकीच्या वेळी त्याला विचारलं मतदान करणार का? तर साहेब नाही म्हणाले. ह्या आधीही कोणत्याच निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला नाही आहे. हा मराठीचा दाता आपल्या मुस्लीम रूममेटशी हिंदीत बोलतो. Continue reading

Advertisements

असे परप्रांतीय

माझ्या राशीला हे का लागले आहेत ते काही कळत नाही. आज सकाळी मी माझ्या वरिष्ठाला (सिनिअर) ला एका कामासाठी एक साधा फोन्ट मागितला. तर साहेबांनी तो दिला नाही. मला काही त्याचे फारसे वाटले नाही. पण शंका आली. मागच्या शनिवारी मी ज्या फायनान्स कंपनी मार्फत लोन घेतले होते. त्या कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला होता. कारण असे कि, ज्यावेळी मी ते लोन घेतले त्याच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी इसीयस झालेले नव्हते. म्हणून मी ज्याचाकडून लोन घेतले त्याला हप्त्याची रोख रक्कम दिली आणि हप्ता भरण्यास सांगितले. नंतर इसीयस झाल्यावर पुन्हा पैसे गेले. हि बाब त्या लोनवाल्याला सांगितल्यावर तो मला रिफंड करावे लागेल. आणि त्याला एक महिना लागेल असे म्हटला होता. Continue reading

राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी

ही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही? कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे.  मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही. Continue reading

नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल

आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय  गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल. Continue reading

मला त्या ‘भैय्याचा’ अभिमान आहे

काल  सकाळची ९ वाजता ची लोकल नेहमी प्रमाणे उशिरा पुणे स्टेशनला पोहचली. झाले तिथेच दहा वाजले. कंपनीत लवकर पोहचाव या उदेश्याने मी रिक्षेने जायचे ठरविले. प्लेटफोर्म क्रमांक ६ वर लोकल आल्याने मला ल मेरेडियन च्या बाजूने जाणे सोपे होते. बाहेर एका रिक्षा वाल्याला विचारले “कोरेगाव पार्क चलणार का?”. तो हो म्हणाला, आणि मी बसणार तेवढ्यात म्हणाला “फिफ्टी रुपिझ होगा”. त्याने पहिल्यांदी ‘हो’ असे उत्तर दिले. नंतर हिंदी डायरेक्ट . काय करणार पूणेकरांची खोड. Continue reading