स्वरूप पहा

काल माझ्या एका परम मित्राने मला एक इमेल पाठवला. त्यात दोन छायाचित्र आहेत. एकात मनसेचे उर्दूत पोस्टर आहे. आणि दुसऱ्यात मनसेचा एक उमेदवार युपी भैय्याकडे मतासाठी हिंदीत बोलत आहे. इमेलच्या सुरवातीलाच ‘फ़क्त मुस्लिमांच्या मतांसाठी उर्दू भाषेत पोस्टर लावले. मुस्लिमाना मराठी समजते मग कशाला ही नाटके….? हेच का तुमचे मराठी प्रेम………?‘ अस लिहिलं आहे. बघून खरच दुख झाले. पण आपण त्या विषयावर नंतर बोलू. माझा जो मित्र आहे. म्हणजे ज्याने हा इमेल पाठवला. याचा इतिहास आपण आधी बघू. याने अजूनपर्यंत कधी मतदान केलेलं नाही. मागील लोकसभेच्या निवडनुकीच्या वेळी त्याला विचारलं मतदान करणार का? तर साहेब नाही म्हणाले. ह्या आधीही कोणत्याच निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला नाही आहे. हा मराठीचा दाता आपल्या मुस्लीम रूममेटशी हिंदीत बोलतो. Continue reading

Advertisements

कुठे आहे राज ठाकरे?

आज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे?’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा?’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे?’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत?, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का?’ मग कुठे काही म्हणतात. Continue reading

दहीहंडी महत्वाची नाही

पुण्यात नेहमी जोरदार साजरी होणारी दहीहंडी, या वेळी मात्र स्वाइन फ्लू आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. ही खरच आनंदाची बाब आहे. दोन दिवस पूर्वी येरवडा पुलाच्या बाजूला दहीहंडी कार्यक्रमाची मोठी मोठी पोस्टर लागली होती. एका पोस्टर वर तर चक्क ५ लाखाचे बक्षिस देण्यात आले होते. परंतु आज सकाळ पासून विविध मंडळ यांचे दहीहंडी रद्द अशी पोस्टर बघून बरे वाटले. दहीहंडी हा आपण खर तर मोठ्या आनंदाने साजरा करणारा उत्सव. जगात कुठेही अस घडत नाही. माणसांचे थरावर थर. आणि बघता बघता एक उंचच्या उंच असा मनोरा बनतो. एक चिमुरडा या सर्वांच्या उंच थरावर पोहचतो आणि उंच बांधलेली दह्याची हंडी फोडतो. हे सगळ अगदी उत्साह वर्धक आणि रोमहर्षक पद्धतीने होत. कधी कधी थर कमी असेल तर हंडी फोड़ता येत नाही. परंतु त्याही वेळी उत्साह तेवढाच असतो. हे सगळे गोविंदा त्याही वेळी नाचतच असतात. आणि पाहणारे आनंद लूटत असतात. Continue reading