मन म्हणजे..

मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. Continue reading

Advertisements

एकदा तरी

मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू? ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही’ असा जप सुरु करतो. किती कठीण आहे यार हे माझे मन. माझेच ऐकत नाही आहे. Continue reading

मन, मेंदू आणि मी

मी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना? मग ती का नसेल आली दोन दिवस? की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो. Continue reading

माणुसकी

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading

मित्र

परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. Continue reading

रद्दताई पाटील

कोणीही चिडायचे नाही आता! आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना! एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी? आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना! Continue reading

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading