मा. डॉ. मुन्नी सिंह यांचे आवाहन जसच्या तस्

राम जन्मभूमी – बाबरी मशीद शीर्षकाच्या दावाच्या उच्च न्यायालयाचा निकाल दि. ३०-९-२०१० रोजी अपेक्षित आहे. हा निकाल म्हणजे एका दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेचे निष्पन्न असेल. हे वेगळे सांगावे लागू नये की, सदर निकालाचा सर्वाधिक आदर केला गेला पाहिजे. हा निकाल झिडकारून द्यायला तुम्ही कृषिमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत. विसरलात का? तुमची शॉर्ट टर्म मेमरी झालीये. आमीर सारखी. चला मी आठवण करून देतो. मध्यंतरी, सर्वोच्च न्यायालयाने धान्य सडण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा असा आदेश काढला होता. आणि आम्ही तो आदेश ‘धुवे में उडा दिया’. Continue reading

Advertisements

भीमरूपी महारुद्रा

ही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते? मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं! कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली. Continue reading

दंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची?

मागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’. Continue reading