एक थी मांजर

एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या  भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. Continue reading

Advertisements

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading