माथेफिरू

हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. Continue reading

Advertisements

दादांची वाढदिवसाची भेट

‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून  ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा!’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे!’. पुतण्या ‘हो! अगदी, म्हणून तर पक्षाचे चिन्ह..’. तिकडून काकांनी आवाज वाढवत ‘आले, ते घड्याळ तुझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. तुम्ही लोक खूप आळशी आहात. म्हणून मी ते घड्याळ घेतले’. ‘माफ करा काका’ पुतण्या उत्तरला. काका करड्या आवाजात ‘माफी असावी, अशी आर्जव किती करणार? परपक्षीय लोक जास्त सीट आणतात हे त्यांच्या हुशारी आणि शिक्षणामुळे..’. Continue reading

जहाल मुंगीची गोष्ट

मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading