वेड असावे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला  अपडेट्स. Continue reading

Advertisements

आकर्षण

सकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच. Continue reading

आमची कार्टी

काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, पण खूपच बेकार वाटत आहे. काय कोणाला बोलायचे आता? Continue reading

हे मित्र ना..

हे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श! हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले. Continue reading

यांना म्हणायचे खरे मित्र

जे आपल्याला कधीही आणि चुकूनही फोन करणार नाही. फार फार तर मिस कॉल. आणि केला तर काही ‘त्यांचे’ काम असेल तरच. आणि त्यांचे ते काम म्हणजे जणू काही ‘राष्ट्रीय संकट’ आहे, असा आविर्भाव आणतील. पण आपले काही काम असेल तर मग मात्र जणू काही अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागतील. आपण फोन केला तर त्यांना फोन कट करण्याचा ‘जन्मसिद्ध’ हक्क. आणि आपण कट केला तर त्यांची नाराजी. ज्यांना त्यांची इच्छा महत्वाची वाटेल, आपली नाही. थोडक्यात त्याचं काम ‘काम’, आणि आपल काम ‘टाईमपास’. Continue reading

काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते. Continue reading

मी एक मूर्ख

खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली होती. आणि ती मते मला मान्य देखील होती. कारण ती चूक माझ्यामुळेच सुरु झाली होती. प्रत्येकाला हवी ती आणि तशी मते मांडण्याचा अधिकार आहे. आणि मला देखील ते मान्य आहे. मी देखील माझी मतेच मांडत असतो रोज. फरक फक्त इतकाच की मी, फक्त माझ्याच बद्दल बोलतो. मला काय वाटले, माझ्यासोबत काय घडले. बस्स! यापलीकडे मी जातच नाही. आणि गेलो तरी जेवढ्यापुरते तेवढेच. Continue reading