गाणी

आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. Continue reading

Advertisements

गणपती विसर्जन मिरवणूक का स्वतःची करमणूक?

काल रात्री आमच्या येथील विजेचा ट्रास्न्फार्मार जळाल्याने आज रात्रीपासून आज सकाळ पर्यंत वीज नव्हती. आता सकाळी मी झोपलो असल्याने काही मला जाणवले नाही. रात्री मी ट्रास्न्फार्मार जळल्याचा आवाज एकाला होता. आज अनंतचतुर्दशी असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे मी सकाळी उशिरापर्यंत झोपलो होतो. पण १०- १०:३० च्या आसपास मला मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजाने जाग आली. उठून पाहतो तर आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची निघण्याची तयारी बहुतेक चालू होती. आवाज एवढा मोठा की, शेजारच्याच्या कानात ओरडून सांगितले तरी एकू जाणार नाही एवढा. बर आज शेवटचा दिवस ना, म्हणून मी म्हटलं की एखादा दिवस वाजवलं तर काय बिघडतंय. म्हणून मी घरात येऊन पुन्हा झोपलो. Continue reading

गणपतीची वर्गणी

ज सकाळी सकाळी समोरच्या इमारतीतील छोटी छोटी मुले गणपतीची वर्गणी मागायला आली होती. नंतर संध्याकाळी आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची मुले वर्गणी मागायला आली. दोघांनाही वर्गणी दिली. वर्गणी आणि माझे फार जुने नाते आहे. मराठी शाळेत शिकत असताना नेहमी वर्षातून एकदा सैनिकी फंड साठी एक रुपयाचे ते स्टीकर घ्यायचो. आणि इतरांप्रमाणे ते मी माझ्या कंपास पेटीला लावायचो. माध्यमिक शाळेत असताना वर्गात देखील आम्ही गणपती बसवायचो. त्यावेळी देखील आम्ही वर्गणी गोळा करायचो. Continue reading