हाक

हाक मारण्याच्या अनेक मजेशीर पद्धती आहेत. मी रोज ज्या खानावळीत जेवणाला जातो तिथे तर, अनेक नवनवीन पद्धती पाहायला मिळतात. वाढपी करणाऱ्यांची नावे जवळपास कोणालाच माहित नाहीत. मलाही नाही. मग त्यांना हाक मारण्यासाठी कोणी ‘शुक शुक’, तर कोणी ‘मित्रा’. दोन दिवसांपूर्वी तर ‘सुकs सुक’ हो! ‘सुक सुक’. ‘शुक शुक’, ओ, अरे, चूक चूक आतापर्यंत ऐकलेल. हे सुकsसुक ऐकून हसू येत होत. म्हणजे उच्चारण्याची पद्धत जाम मस्त होती. Continue reading

Advertisements

अशोक’राव’

चित्रपटाची सुरवात एका अतिरेकी भीषण हल्याने होते. मुंबईत हल्ल्याने सारा देश हादरून जातो. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होते. बेजबाबदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. पक्षश्रेष्ठी नवा मुख्यमंत्री कोण करायचा याचा शोध घ्यायला सुरवात करतात. आणि नांदेडात त्यांना हवा तसा व्यक्ती भेटतो. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यावर तो कामाला सुरवात करतो. पण पक्षातील आणि विरोधक त्याला नावे ठेवायला सुरवात करतात. मंत्रिमंडळाची बैठकीला सुरवात होते. सर्व मंत्री नवा मुख्यमंत्री किती फंटूश आहे यावर गप्पा मारायला सुरवात करतात. तेवढ्यात, मुख्यमंत्र्याचे आगमन होते. सर्वजण शांत होतात. Continue reading

पुन्हा एकदा सगळ फूस

आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस. Continue reading

प्रिटी वूमन

दाराची बेल वाजते. दार उघडले जाते. प्रिटी वूमन समोर येऊन ‘नमस्कार, कसा आहेस हेमंत?’ . मी ‘चांगला’. प्रिटी वूमन ‘या’. घरात गेल्यावर, ‘आपले अभिनंदन!’. प्रिटी वूमन हसून म्हणाली ‘धन्यवाद, पण मला माहिती आहेस की तू कुणाच्या म्हणण्यावरून इथे आला आहेस’. मी ‘नाही, मी तुमचे अभिनंदन करणारच होतो’. ‘मला माहिती आहे, अनुक्षरे ताईच्या बोलण्यावरून तू इथे आला आहेस’. मी ‘हो, पण माझ्या मनात सुद्धा यायचे होते’.  ‘पण तुम्हाला अनुक्षरेताई कशा काय माहित?’ मी म्हणालो. प्रिटी वूमन ‘अरे, मी तुमचे ब्लॉग वाचते’. मी म्हणालो ‘पण तुम्हाला मराठी..येते?’. प्रिटी वूमन ‘हो, मुंबईत यायचे म्हणजे मराठी आलीच पाहिजे’. मी ‘वा!’. प्रिटी वूमन ‘बोल अजून काय म्हणतोस?’. मी ‘आपली मुलाखत घेण्याची इच्छा होती’. प्रिटी वूमन ‘कर सुरु’. Continue reading

चार स्तंभ

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने आमच्या सर्व खासदारांचे वेतन सोळा हजारावरून ऐशीं हजार झाले. कोणत्याही खासदाराला काहीच वाटले नाही. आणि कोणताही खासदार या विरोधात काही बोलला देखील नाही. आणि ना कोणता पक्ष या विरोधात गेला. हा आहे आपल्या लोकशाहीचा पहिला स्तंभ, ज्यावर आपली लोकशाही टिकली आहे. Continue reading

आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

कला

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. Continue reading