एकतर्फी

सगळंच संपल्यासारखे वाटते आहे. खर तर कालच बोलणार होतो. पण रात्री संगणक सुरु केल्यावर सुद्धा मूड नव्हता बोलायचा. काल तिने एकदाही साध ढुंकूनही पहिले नाही. आणि कॅन्टीनमध्ये देखील आली नाही. आणि सकाळी केलेले ‘गुड मॉर्निंग’  पिंग आफ्टरनून झाल्यावर ‘गुड आफ्टरनून’ केल. खरंच खूप बेकार वाटत आहे. सगळंच उदास वाटत आहे. मुळात मीच मुर्ख आहे. माझ्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. आणि आता ती देखील. ती बिझी असतांना मी तिला पिंग करून त्रास देतो. सारखा तिच्याकडेच पहात रहातो. बर हे कमी म्हणून की काय मेल पाठवून अजून तिला डिस्टर्ब करतो. नाहीतरी ‘मी चुका सम्राट’ आहेच. Continue reading

Advertisements

आकर्षण

सकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच. Continue reading

प्रेम

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती गोष्ट वेगळी की माझ्या मित्राला ती खूप आवडायची. त्याला नंतर नंतर आमच्या दोघात काही तरी. म्हणजे त्याच्या चित्रपटाचा मीच ‘व्हिलन’ वाटायला लागलो. म्हणून मग मी तिच्याशी बोलायचे बंद केले. Continue reading

फक्त अप्सराच

कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच. Continue reading

कस बोलू?

यार आज राहावतच नाही आहे. आज सकाळी किती वेळ त्या कॅन्टीनमध्ये टाईमपास केला. पण अप्सराचा पत्ताच नाही. तसे माझीच चुकी म्हटली पाहिजे. मी अजून थोडा वेळ थांबायला हवं होत. कंपनीत आली, तर तिच्या सोबत तो तिचा मित्र आणि मैत्रीण. कस बोलू? ते गेले की, तिच्याशी बोलायला जाव म्हटलं तर ती जागेवर नसणार. असाच चालू आहे कालपासून. कालही असेच. ती माझ्या डेस्कच्या बाजूने जाते पण बघत नाही. काल किती वेळा गेली माझ्या डेस्कच्या बाजूने. पण एकदाही माझ्याकडे पहिले नाही. कधी कधी वाटत तिला माझ्यात रसच नाही आहे. Continue reading

हिम्मतराव

यार, ती किती सुंदर आहे. असो, आजही ती खूप गोड दिसते आहे. नाही ‘गोडू’. आजकाल तिला सोडून दुसरीकडे लक्षच जात नाही आहे. तिच्यासमोर जाण्यासाठी रोज एकावेळी दोन-पाच टिश्यू पेपरला बलिदान करावे लागते आहे. दिवसातून मी दहादा तिच्यासमोर जातो. आणि जाण्याआधी वॉशरूममध्ये कसा दिसतो, ह्याच्यासाठी जातो. पण तिच्या डेस्क जवळ गेले की, तिला बघण्याची हिम्मत होतच नाही. Continue reading

सख्खे

आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून चहा प्यायला जाऊयात म्हणून त्याचा आग्रह. बर, मी पण त्यावेळी वेडाच! लगेचंच. मग चहाच्या टपरीवर गेलो की, तो मला ‘दोन रुपये सुट्टे आहे का?’ अस विचारणार. मी बसने जा ये करायचो. त्यामुळे सुट्टे पैसे असायचे. आई वडिलांनी थोडे फार तरी खोटे बोलायला शिकवले असते तर किती बरे झाले असते. मी पैसे काढून द्यायचो. आणि त्याची तो एक सिगारेट खरेदी करायचा. Continue reading