व्यसन

विश्वातील बहुतांश लोकांना कोणते न कोणते व्यसन जडलेले असतेच. कदाचित आश्चर्य वाटेल! परंतु, खरे आहे. साधारणतः ज्या सवयीचा, मग ती कोणतेही असो, त्या सवयीचा अतिरेक झाला की त्याला ‘व्यसन’ असे संबोधतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. Continue reading

Advertisements

नशीब

ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन! Continue reading

कृष्णलीला

सुदामा पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो. नवीन कंपनीत कोणीच मित्र नसल्याने तो एकटा रहात असतो. कंपनी आणि घर हाच काय तो दिनक्रम. दोन-अडीच महिन्याने त्याची ओळख एका ‘कृष्ण’ सोबत होते. हळू हळू मैत्री वाढते. तसा कृष्णही भारीच असतो. दुसऱ्याच महिन्यापासून ‘लीला’ दाखवायला सुरवात करतो. एके दिवशी सुदामा काम करीत असतांना त्याच्या डेस्कवर येतो. सुदामा आनंदाने त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात करतो. खर तर कृष्णाला सुदामाच्या मानाने दीडपट पगार. पण तरीही ‘मदत’ मागतो. सुदामाने कारण विचारल्यावर, ‘मला तुझ्या बँकमधील अकौंट असलेल्या माझ्या बाबा वासुदेवांना गावी पैसे हवे आहेत. माझ्या बँकेने पाठवले तर, वेळ लागेल. तू पाठव. मी हवं तर दुपारीच पैसे वापस करील’ अस कृष्ण सुदामला सांगतो. सुदामा कृष्णाच्या या अडचणीत त्याची मदत करायचे मान्य करतो. आणि ताबडतोप पैसे वासुदेवाच्या अकौंटमध्ये टाकतो. Continue reading

मुकामार

आता रात्री जेवायला हॉटेलात गेलो होतो. जेवण यायला वेळ लागेल म्हणून तिथला एक वेटर सांगून गेला. खर तर खुपंच भूक लागलेली. माझ्या समोरच्या बाजूच्या एका टेबलवर एक कपल बसलेले. तसे दोघेही छान होते. अंतर फारसे लांब नव्हते. दोघांच्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या. ती मुलगी त्याला सांगत होती की मी तुझा फोटो घरच्यांना दाखवून लगेच डिलीट करील. आणि तोही हसून तीचा आणि त्याचा मोबाईल घेऊन काहीतरी करीत होता. बहुतेक फोटो तीच्या मोबाईलमध्ये पाठवत होता. नंतर मी लक्ष दुसरीकडे दिले तर एक मुलगी फोनवर. खाता खाता तीच्या फोनवर एकदम बारीक आवाजात गप्पा चालू होत्या. हे दोघे फारच गुंग झालेले. मी ऐकायचे टाळून सुद्धा, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. आणि त्यात तो वेटरही लवकर जेवण घेऊन येईना. शेवटी वैतागून मी, तिथून निघून घरी आलो. येतांना दुध आणि आम्रखंड आणले. Continue reading

एक्स ६

परवा कंपनीतून निघाल्यावर डायरेक्ट मोबाईल स्टोअर. त्यानंतर नोकियाचे कस्टमर केअर. आणि त्यानंतर अजून एका मोबाईल दुकान पालथे घातले. सुरवातीला सॅमसंग चॅम पहिला. चांगला आहे. स्वस्तात मस्त. चार साडेचार हजारात टच स्क्रीन. पण कॅमराला क्वालिटी नाही. मग सॅमसंगचा गॅलक्सी पहिला. तो तर मस्तच. काय बोलू. सर्व काही आहे त्यात. अजून एक पहिला एचटीसी टॅटू. तो मला आवडलेला. पण, तीन मेगा पिक्सल कॅमरा. त्यामानाने मग मला तो नोकियाचा एक्स ६ चांगला वाटला. थोडा लुक डब्बा वाटला पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. सॅमसंगचा गॅलक्सी, एचटीसी टॅटू आणि एक्स ६ मध्ये ५ मेगा पिक्सलचा कॅमरा आहे. त्यामुळे, बाकी त्याच्यात आणि इतरात फार काही फरक नाही. आणि खर बोलायचे झाले तर, तिचा सुद्धा तोच मोबाईल आहे. म्हणून मग. Continue reading

विठ्ठला कोणता मोबाईल घेऊ हाती…

माझा प्रिय मोबाईल आजकाल नीट वागत नाही आहे. तब्येत सारखी खराब होते त्याची. कधी कधी ऑपरेशन फेल म्हणतो. आणि कधी कधी अचानक बंद देखील होतो. काय कळेना. एक महिन्यापासून असाच वागतो आहे. त्यामुळे पुढील महिन्यात नवीन मोबाईल घ्यावा असा विचार करतो आहे. आता माझा नोकियाचा ३६०० स्लायडिंगचा आहे. तसा छान आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेला. आणि त्या नोकिया कंपनीचे हेडफोन देखील नीट राहत नाहीत. सारखे खराब होतात. आता गेल्या वर्षभरात चार सहज विकत घेतले गेले असतील. नेहमी पाच-सहाशे खर्च करायला नाही परवडत. त्यामुळे आता कोणत्या कंपनीचा घ्यावा इथपासून सुरवात झाली आहे.  Continue reading

आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading