लव आजकाल

रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती  कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या  बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स  गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल लागलेला होता. करायचे काय म्हणुन आयनोक्सकड़े बघायचो कधी तिथे जाणारे मुले मुलींकडे बघायचो. बरेच जण येत होते. सकाळच्या शो ला पण गर्दी असते हे मला त्या दिवशी बघून कळले. तिथे एका मुलगा सारख्या फेर्या मारत होता. कोणी तरी यायचे होते वाटत. जसा जसा वेळ जात होता तसा त्याचा पारा चढत होता. Continue reading

Advertisements

‘ती’ ची आई

काय करू ती चा विषय डोक्यातून जाताच नाही. आज मी रक्षाबंधन निमित्ताने संध्याकाळी माझ्या लहान बहिणीकड़े गेलो होतो. काकाने आज जेवायलाच बोलावले होते. जेवण खुपच छान होते. जेवण करत असताना मी न राहून काकाला ती च्या बद्दल विचारले, की ती कशी आहे. आली होती का घरी? काका म्हणाला मला तीची आई म्हणाली की ती तुझ्या तिकडेच (मी जिथे राहतो त्या भागात) रहाते. आणि तीला एकदा भेटून या असे त्यानी सांगितले. मग तू भेटलास अस विचारल्यावर तो म्हणाला जाइल. काकाच्या एकुणच बोलण्यावरुन फारच दुखी किंवा काही वाटते अस काही वाटल नाही. Continue reading

रक्षा बंधनाचा धोका…

रक्षा बंधनाच्या दिवशी माझी नेहमी महाविद्यालयाला बुट्टी. घरी सांगायचो की आज सुटी आहे. खर तर मला कोणीच मैत्रिण नव्हती तरी देखील मला भीती वाटायची. की कोणी आणून राखी बांधली तर काय?. मला ही भीती शाळेत असल्या पासून निर्माण झाली. शाळेत मुली मुलाना राखी बांधयाच्या. मग असा काय नियम नव्हता पण राखी बांधली की १० रुपये द्यावे लागायचे. आई ने कधी एक रूपया दिला नाही. मग दहा रुपये सोडाच. नंतर नंतर या मुली देखील हुशार झाल्या. एक एक रुपयाच्या ५-१० राख्या घेउन यायच्या. आणि किमान १००/- घेउन जायच्या. बर राखी नको म्हटल की, त्या मनाला वाटेल तो अर्थ काढायच्या. किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला राखी बांधली नाही तरी देखील असाच काही अर्थ इतर लावायचे. Continue reading