महाराष्ट्र कुणाचा??

खर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.

स्पृहा आठल्ये

 

Continue reading

Advertisements

महिला आरक्षण

घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित पुण्यातील अनेकांचा या ‘आरक्षणाला’ तात्त्विकदृष्ट्या विरोध आहे. उदाहरण पहायचं असेल तर ‘अग बाई अरेच्या’. पण माझा तरी सगळ्याच ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध नाही. Continue reading

यापुढे कर भरणार नाही

खरच बरोबर आहे. माझ्या नुसत्या बडबडीला काय अर्थ आहे? काल माझ्या एका नोंदीला आलेल्या प्रतिक्रियेत हेच होते. प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मी ज्या सरकारला नाव ठेवत आहे. तेच मुळात काहीही न करू शकणार आहे. शंभर कोटी प्रेतांच्या देशात अजून काय घडू शकते? पुण्यात बॉम्बस्फोट होणार हे ह्या नंदी बैल मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पोलिसी कुत्र्यांना माहिती होती. तरी देखील.. सोडा परत मी त्यांच्यावर सुरु झालो. ते काहीच करू शकत नाही. चार माणसांच्या बदल्यात इस्राईलने पेलेस्टांइनच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजभवनात रणगाडे घालून त्याला ठार मारणारे आपण नाही आहोत. जर सरकार आपल्या लोकांना असच मरू देणार असेल आणि आपल्याच जीवावर स्वतः कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आपण का कायदे पाळायचे? या वेळेपासून मी सरकारचा कर भरणार नाही. Continue reading

राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार

राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार मागील काही दिवसांपासून ह्या तीन गोष्टींनी खूप वैताग आणला आहे. काय कळत नाही, की आपण सगळे आणि मुख्य म्हणजे हे मिडीयावाले एवढा काय मोठेपणा देतात. काही दिवसांनी बहुतेक राजकारण्यांचे क्रिकेटर आणि कलाकार यांच्या प्रतिमा लावतील. आणि ह्या सगळ्यांचे वाढदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतील. देशावर रोज पाक हल्ले करतो आहे. कधी नकली नोटा, कधी बॉम्ब हल्ले आणि कधी कधी आपल्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो आहे. आपले जवान त्यांच्याशी लढताना शहीद होत आहे. रोज नक्षलवादी देशात कोणाची ना कोणाची हत्या करतात. Continue reading