जय जय महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच खूप सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा! क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र ह्या बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच. कधी भाषेवर तर कधी जागांवर आक्रमणे. आणि कधी कधी तर महाराष्ट्र तोडण्याचीच भाषा. त्याच अस आहे. प्रत्येकजण आपआपली मते, आपल्याला येणाऱ्या अनुभवावरून बनवत असतो. मध्यंतरी भाजप – शिवसेनेचे ‘टाईमपास’ पाहून जाम विटलो होतो. मराठी भाषेला नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फारच विटून गेलेलो. पण गेल्या काही दिवसांत अशा लोकांशी सबंध आलेला, की ज्याने मी एकटाच असा नाही असे वाटू लागले..
Continue reading

पंतप्रधानांची विशेष मुलाखत

नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर. Continue reading

त्या तिघी

एक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर काढतात. आणि इन्कम टॅक्सवाले संघ मालकांच्या घरावर धाडी टाकतात. जिच्या नवर्याचे नाव भोपाळ वायू दुर्घटनेतील मुख्य आरोपीला देशातून बाहेर सुखरूप नेण्यात येताच एका राज्याचा मुख्यमंत्री तो गुन्हा स्वत: केला असे सांगतो. जिच्या हातात सत्ता कायम असते. मग भाववाढ असो की देशात अतिरेकी हल्ले. Continue reading

लयलूट

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ड्राईव्ह. त्यामुळे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर घ्यावा लागला. मित्राला त्या एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत विचारली तर तो बोलला की अंदाजे दोन हजारापर्यंत जाईल. चिंचवड स्टेशनला डेटा केअर सेंटरमध्ये गेलो. तिथे जाऊन चौकशी केली तर त्यांनी सॅमसंग एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत चार हजार दोनशे सांगितली. Continue reading

खेळ

काही दिवसांपासून, कंपनीच्या बस मधून उतरलो की घरी येतांना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. तिथे रोजच मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो खेळ खूप मजेदार असतो. एका चेंडूला चौकार तर पुढच्याच चेंडूला फलंदाज बाद. संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे चिल्लर कंपनी धुमाकूळ घालत असते. हे सगळ पाहून मला मैदानी खेळ खेळायची इच्छा होणार नाही तर नवलच. परवा जाऊन एक फुटबॉल आणला. आणि दोन दिवसांपासून मी, माझे भाऊ बहिण आणि त्यांचे मित्र असे संध्याकाळी मैदानात फुटबॉल खेळतो. एका वर्षानंतर मैदानावर खेळतो आहे. त्यामुळे आनंद खूप होतो आहे. संगणकावर, मोबाईलवर खेळण्यापेक्षा मैदानात जाऊन खेळण अधिक मजेदार आहे. काही वर्षांपासून कोर्स, नोकरी यात इतका गुरफटून गेलो होतो की खेळण हा प्रकारच बंद झाला होता. आणि इथ आल्यापासून कोणी मित्र वगैरे झालेच नाहीत. आणि जे झाले ते कंपनीमधील त्यामुळे हा खेळाचा विषयच कधी आला नाही. Continue reading