रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading

Advertisements

काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’. दुसरे ‘गुलझारीलाल नंदा’, तिसरे ‘लाल बहादूर शास्त्री’, चौथ्या ‘इंदिरा गांधी’, पाचवे ‘मोरारजी देसाई’, सहावे ‘चरण सिंग’, सातवे ‘राजीव गांधी’, आठवे ‘विश्वनाथ प्रताप सिंग’, नववे ‘चंद्रशेखर सिंग’, दहावे ‘पीव्ही नरसिंहराव’, अकरावे ‘अटलबिहारी वाजपेयी’ हुशः काय यादी आहे. अजूनही एक नाव राहिलेच ‘इंद्रकुमार गुजराल’. आता नावात ‘र’ असलेला भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असा नियम नाही. पण एक दोन सोडले तर बाकीच्या पंतप्रधानांच्या नावात ‘र’ आहेच. Continue reading

रेशनकार्ड मिळाल

शेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले. Continue reading

वाढदिवस

काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. गप्पाही खूप झाल्या. ती म्हणत होती की तीच्या वाढदिवसाला नेहमी पाऊस पडतो. म्हणजे अस काही नियम वगैरे नाही. पण अस घडतं. मी नुसतंच हसलो त्यावेळी. ती ज्यावेळी हे सगळ सांगत होती त्यावेळी दुपारी कडक ऊन पडले होते. आणि संध्याकाळी खरंच पाऊस आला. पण यावेळी माझी पावसात भिजायची इच्छा पूर्ण झाली नाही. मी घरी आलो त्यावेळी पाऊस पडून गेला होता. कालही असंच. Continue reading

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वेबसाईटवर जात होतो. त्यांच्या लेखांवर मी माझी प्रतिक्रिया पाठवायचो. पण मोजून दोन तीन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या. ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ताचे’ ही हेच. लोकसत्ताच संपादक नेहमी नवीन नवीन अग्रलेखात ‘चमत्कार’ घडत असतात. सुरवातीला मी ताबडतोप प्रतिक्रिया पाठवायचो पण ते प्रतिक्रिया प्रकाशितच करत नाहीत. Continue reading

विचार का करायचा?

या वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे. Continue reading

काय करावं???????

आज कंपनीत एक काम दिल होत. आजचीच डेडलाईन दिली होती. पण नाही झाल माझ्याकडून ते पूर्ण. सुरवातच बेकार झाली. मागील दोन आठवडे बेंचवर बसून होतो. आणि आता काम दिल आणि ते देखील वेळेत झाल नाही. त्यात ना तिचा विचार सारखा येतो. सोडा तो विषय नाही तरी आजकाल दुसर काही मी बोलत नाही म्हणाल. शनिवारी आमच्या कंपनीतील टीमची पार्टी होती. एकदम झक्कास झाली. आणि रविवारी मित्रांसोबत ‘अवतार’ चित्रपट बघून आलो. जर अनिमेशनची आवड असेल तर जरूर पहा. खुपच जबरदस्त अनिमेशन आहे त्यात. कथा म्हणाल तर मला फार काही खास अशी काही वाटली नाही. पण चित्रपटातील इफेक्ट्स छान आहेत. अरे, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. मागील शुक्रवारी माझे नव्या कंपनीतील मित्र आणि माझा ‘मराठी आणि मनसे’ यावरून वाद झाला. वादच म्हटला पाहिजे. त्यांना मी सांगितलेले मुद्दे पटले नाहीत. मला ते दोघे ‘सगळे भारतीय आहेत. कोणालाही कुठेही राहण्याचा आणि स्वत:ची भाषा जपण्याचा अधिकार आहे.’ ‘मराठी लोक काम करत नाहीत’. अस बरंच काही बोलत होते. Continue reading