महिला दिन

आज खरोखरच महिला दिन आहे, याची प्रचीती येत आहे. सकाळी रस्त्यात एक आजी आडव्या आलेल्या. इतका भला मोठा डिव्हायडर कसा ओलांडला हाच मी अजून विचार करतो आहे. किती होर्न वाजवला. मिनिटभर मी माझ्या बाईकचा होर्न वाजवत होतो. आजींना ऐकू नसेल येत. पण दिसत तर होते ना. पार जवळ गेल्यावर अगदी फुटभर अंतर उरल्यावर आजींनी माझ्याकडे पाहण्याचे कष्ट घेतले. पाहून त्यांना धक्का बसण्या ऐवजी मलाच बसला. माझीच धडधड वाढलेली. त्यांच्यात तूसभर देखील फरक नाही. अस अचानक, ते सुद्धा पुलावर! अर्धा माणूस भरेल इतका मोठा डिव्हायडर होता. आजींना पाहून अस वाटत होते की रेहमानला सोबत घेऊन ‘मा तुझे सलाम’ गाणे म्हणावे. Continue reading

लव्ह मॅरेज

काल रात्री काकाने घरी मला बोलाविलेले. म्हणून गेलेलो. जेवण झाल्यावर भिंग घेऊन माझ्या पंजावरील रेषा पाहत बसलेलो. घरी आहेत काही पुस्तके त्या हस्तरेषावर दहावीच्या सुट्टीत वाचलेली. दोन मिनिट झाले नसतील तर मैत्रीण आली. झालं, आल्यावर लगेच ‘मुलींचा कोणता पाहतात?’ विचारलं. ‘डावा’ म्हटल्यावर डावा हात दाखवला. आणि मला म्हणाली ‘सांग माझ काय होणार लव्ह की अरेंज मॅरेज?’. तिला सांगितले मला नाही कळत काही त्यातील. तरी ऐकेच ना. एकतर तिचे वागणे आजकाल मला भीतीदायक वाटत आहे. Continue reading

नाही

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना! Continue reading

मित्र

परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. Continue reading

कला

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. Continue reading

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading