विषय लग्न

मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय? त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे. Continue reading

Advertisements

वनवास संपला

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग केलल. पण तिने रिप्लाय दिलाच नव्हता. वाटल ती बिझी आहे म्हणून. नंतर स्वतःहून करेल. पण त्यानंतर ना तिचा इमेल आणि ना साधे पिंग. बरोबर चौदा दिवस. पण अशी माझी काय चूक झाली होती, काय माहित. Continue reading

अधांतरी

एक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वनरूम किचन आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही. Continue reading

पसंत कर

मागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली. Continue reading

बेकार दुपार

काय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या. Continue reading

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading

नाही

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना! Continue reading