आम्ही पुणेकर

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading

Advertisements

ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस

माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ब्लॉगबाळाच्या जन्मानंतर सगळंच बदललं. Continue reading

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. Continue reading

रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली. Continue reading

मुलगी पाहिजे

याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते. Continue reading

स्वप्न

पहाटे एक स्वप्न पडलं होत. ‘ती’च्या वडिलांनी तीच्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पसंत केल. आणि तिचा सुद्धा याला होकार होता. यार असली स्वप्न पहाटे का पडतात? मी मुंबईला नोकरी जाण्याआधी एकदा एक स्वप्न पडलं होत की मी एका माझ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसावर रागावतो आहे. आणि ते स्वप्न सात महिन्यांनी खरं झाल होत. एकदा मुंबईच्या कंपनीतील माझा बॉस मला दर दहा मिनिटांनी काम किती झाल अस सारखं विचारात होता. आणि त्यावेळी मी त्याला रागाच्या भरात ‘झाल की सांगतो’ अस म्हटलं. सगळ स्वप्नात घडल्याप्रमाणे घडल. गोष्ट घडून गेल्यावर ही गोष्ट आधी कुठे तरी पाहिलेली अस वाटायला लागल. मग लक्षात आल की हे आधी मी स्वप्नात बघितलं होत. Continue reading

रेल्वे

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका. Continue reading