टीसी

आज सकाळी लोकल चुकली. येताना लोकल वेळेवर आली. पण नेहमीप्रमाणे उशिरा निघाली. पुणे स्टेशन वरून निघायची वेळ सातची आणि निघाली सव्वा सातला. मी नेहमी येताना शेवटून दुसऱ्या डब्याच्या पहिल्या गेटवर असतो. महिन्याच्या अखेरच्या काही दिवस टीसी (तिकीट चेकर) आमच्या डब्यात तिकीट चेक करायला नक्की येतो. आता नक्की यासाठी म्हणतो कारण मी त्या डब्यात रोज असल्याने मला पक्क माहित झाल आहे. आणि कोण कोण टीसी आहे हे देखील माहित झाल आहे. त्यातील एक पंजाबी टीसी आहे. तो नेहमी डब्यात येत असतो. गोल चेहरा आणि चेहऱ्याप्रमाणेच शरीरयष्टी, पण धष्टपुष्ट.काळा रंगाचा कोट, भरदार दाढी- मिश्या आणि डोक्यावर पगडी. खर तर त्याच वर्णन करावा असाच आहे तो. एक वर्षापासून त्याला मी बघतो आहे. अनेक वेळा माझा लोकलचा पास चेक केला आहे. पण कधी बोलण वगैरे झाल नाही. Continue reading

Advertisements

पुण्याची लोकल म्हणजे कचरा गाडी

मागचा अख्खा आठवडा सात वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल साडेसातच्या आत पुणे स्टेशनवरून सुटली नाही. रोज लोक लेखी तक्रार करून देखील, लोकल काही वेळेवर येत नव्हती. शुक्रवारी रात्री तर कहरच. रेल्वेचे कर्मचारी तक्रार देखील लिहून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सगळे प्रवासी लोक त्यात मी देखील पुणेस्टेशन प्रबंधकाच्या केबिन मध्ये गेलो. सगळे फार चिडलेले होते. आम्हाला बघताच प्रबंधक साहेबांनी फोनाफोनी चालू केली. लोकल कुठे आहे? का अजून स्टेशन मध्ये अजून का नाही आलेली?. त्यांना तक्रार लिहून घेतली नाही कळताच त्या स्टेशन प्रबंधकाने त्या रेल्वे कर्मचाऱ्याला झापलं. खर तर मला त्याच्या झापून देखील समाधान होत नव्हत. मला वाटल होत की स्टेशनप्रबंधक ‘ अटल बिहारी’ असेल. पण तो मराठी होता. Continue reading

अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. Continue reading

अकलेचे कांदे

काल रात्री आमच्या इमारतीतील वरच्या मजल्या वरील एक व्यक्ती आला. मला म्हटला कि माझ्या संगणकाचा फोर्मेट मारायचा आहे. मी विचारलं का? तर तो बोलला, माझ्या संगणकातील मेक्याफी अंटी व्हायरस काढायचा आहे म्हणून. त्याला मी म्हणालो मग अनइंस्टाल करायचा मग. त्यासाठी फोर्मेट मारण्याची काय गरज?. तो म्हणाला नाही. फोर्मेट करावा लागेल अस माझा मित्र म्हणाला. त्याला म्हटला मला सुटीच्या दिवशी माझ्याकडे तुझा संगणक घेऊन ये. मग मी तो काढून दुसर एखादा टाकू. तो म्हटला ठीक आहे. बर हा जो व्यक्ती होता ना हा इंजिनियर आहे. आणि त्याच्या हाताखाली पन्नास जण काम करतात. आणि हा बोलतो कि सोफ्टवेअर काढण्यासाठी पीसी फोर्मेट करायचं. Continue reading

गैरसमज

आज संध्याकाळची ५:३० ची शिवाजीनगरहून लोणावळा लोकल पकडली. लोकल चिंचवडला आली. लोकल चिंचवडहून ज्यावेळी निघाली त्यावेळी माझ्या पुढच्या डब्यातील एका गेट वीराने एका मुलीचा स्क्राफ ओढला. ती फारच लोकलच्या जवळ असल्याने त्याचा सहज हात पोहचला होता. गाडीने वेग घेतला. तिचा स्कार्फ बरोबर तिची ओढणीसुद्धा ओढली गेली. ते बघून माझ खर तर काही संबंध नव्हता. पण तरीदेखील तिळपापड झाला. दोन सेकंदासाठी त्या गेट बहाद्दराला शिवी द्यावी अस मनात आल. माझ्या डब्यातील एक जण म्हणाला आजकाल मुल फार मुलींची छेड काढत असतात. खर तर अशी मुलींची छेडाछेडी मी मुंबईला असताना देखील कधी बघितली नव्हती. पुण्यात मुलींना शिट्ट्या मारतात हे बघितलं होत. पण अस अंगावर हात टाकण, पहील्यांदीच बघितलं. मी तो कोण आहे हे बघायचा प्रयत्न करीत होतो. पण तो कोण हे दिसतच नव्हत. माझ्या डब्यातील थंड प्रतिक्रिया बघून माझा खूपच त्रागा होत होता. विचार केला कि पुढच्या स्टेशनाला त्याला गाठायचं. Continue reading