माझी बडबड

मी बडबडा आहे. खूप गप्पा करतो. बहुतेक सगळे मला बघून पकाऊ आला अस मनात म्हणत असतील अस वाटतं. काल कंपनीत दुपारी माझ्या काही सहकारींशी मी बोलत होतो. पण त्यांचे माझ्याशी गप्पा मारण्यात काही रस आहे अस दिसलं नाही. त्या आपल्या पीसीत डोक घालून आपआपल काम करत होत्या. संध्याकाळी लोकलमध्ये माझ्या मित्राशी बोलायला गेलो तर त्याने लगेचच दुसरीकडे तोंड केल. नंतर तो स्वतहून बोलला. पण त्याच्या वागण्याने माझा अडवाणी झाला होता. अस माझ्याबरोबर आधी खूप वेळा घडल आहे. पण आज प्रथमच मला जाणवलं. नंतर मी काही परत त्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत. Continue reading

Advertisements

मी चुका सम्राट

काय सांगू काल आणि आज मी कंपनीत कामात फारच चुका केल्या. तसा चुका अखंडपणे करण्याचा विक्रम मीच नोंदवला असेल. ज्या कामाला फार फार तर अर्धा दिवस लागायला हवा तिथ मी काल आणि आज मिळून दोन दिवस लावले आहेत. आणि अजूनही काम काही झालेलं नाही. अकरावीत असताना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता भ्रष्टाचाराचा. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले. पण ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्या अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्यांच्या समितीतील भष्टाचार बद्दल बरच काही मी त्या निबंधात लिहिले होते. वकृत्व स्पर्धेत भाग घेतला, आणि भाषणासाठी उभा राहिलो. विषय होता माझा आवडता नेता. आणि भाषणाची पारंपारिक सुरवात केली आणि कोणावर बोलायचे तेच नेमके विसरलो. मग काय एका मित्राने सांगितले, मी कोणत्या नेत्यावर बोलणार होतो ते. Continue reading

भाषण का प्रवचन?

१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो. Continue reading