वाद

जगाच्या पाठीवरील इतर दुसऱ्या कोणत्याच देशात इतके वाद होत नसतील. जितके आपल्या देशात होतात. कोणी काही बोलले तरी वाद. नाही बोलले तरी वाद. इतर काही घडो न घडो ‘वाद’ मात्र हमखास घडतात. निमित्त काहीही असते. वर्ष सुरु होवून कसाबसा महिना झाला तर, पंधरा-वीस वाद. आजकाल वादावरून गोष्टीची किंमत ठरते. Continue reading

Advertisements

वर्ष

काय दिवस होता कालचा! सही! मागील वर्षी म्हणजे सात डिसेंबर २००९ला ही कंपनी जॉईन केलेली. थोडक्यात वर्ष झाले. काय बोलू? हे एक वर्ष म्हणजे ‘पिकनिक’ होती. म्हणजे तशी अजूनही चालू आहे. ते म्हणतात ना ‘नाव मोठ आणि लक्षण खोट’ तसं अगदी. कंपनीच्या इमारती आणि इथल्या सुविधांबद्दल काहीच वाद नाही. अतिशय उत्तम आहे. परंतु इथली जत्रा पाहून अचंबा वाटतो. मागील सात डिसेंबर २००९ ला सकाळी सव्वा सातला आलेलो. आठ वाजता येण्याचे सांगितलेलं. मस्त धुक्यात टिवल्या पावल्या केलेल्या. पुढचा इतिहास उगाळत नाही. पण एकूणच छान अनुभव. तो दिवस आणि कालचा दिवस. खर तर कालच या विषयावर बोलणार होतो. परंतु, तो माझा सखा उर्फ लॅपटॉप कोमात असल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छा असून बोलता येत नाही. काल अप्सरा आणि मी ब्रेक आउट रूममध्ये जवळपास पंधरा एक मिनिटे बोलत होतो. Continue reading

प्रेम

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती गोष्ट वेगळी की माझ्या मित्राला ती खूप आवडायची. त्याला नंतर नंतर आमच्या दोघात काही तरी. म्हणजे त्याच्या चित्रपटाचा मीच ‘व्हिलन’ वाटायला लागलो. म्हणून मग मी तिच्याशी बोलायचे बंद केले. Continue reading

अप्सरा

कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो. Continue reading

वाट लावा

काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ‘बॉस’ लवकरात लवकर देतो असं म्हणाले होते. पण नंतर पूज्य दोन तीन महिने कुठल्या समाधित्त मग्न झाले, देव जाणे. Continue reading

लाच

मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली आणि त्या पोलिसाला दिली. पोलिसाने पैसे खिशात टाकले. मला वाटलं की, आता पोलीस त्याला पावती देईल. पण नाही. Continue reading

आकारमान

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. या एप्रिलमध्ये केले तेव्हा ७५ किलो झाले. माझे मित्र वस्तुमान बघून दिसत नसलेले पोट धरून हसत होते. Continue reading