आकर्षण

सकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच. Continue reading

Advertisements

महिला आरक्षण

घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित पुण्यातील अनेकांचा या ‘आरक्षणाला’ तात्त्विकदृष्ट्या विरोध आहे. उदाहरण पहायचं असेल तर ‘अग बाई अरेच्या’. पण माझा तरी सगळ्याच ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध नाही. Continue reading