लाडोबा

तो ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत  शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर म्हणे घरी देखील हातात पाणी दिल्याशिवाय हा पीत नाही. जेवतांना देखील तसेच. म्हणजे डबा का आणत नाही? हा मला न सुटलेला प्रश्न. Continue reading

Advertisements

ती जागा..

कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. ‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती आग भडकावतो. मला खरंच नाही सुचत आहे. डोक खरंच फुटायची वेळ आली आहे. माझ्यातील निर्णय क्षमता आणि निर्णय घेतल्यावर त्यावर अंमलात आणायची ताकत संपली आहे की काय याची शंका येत आहे. Continue reading

विषय लग्न

मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय? त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे. Continue reading

विषय

वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो. Continue reading

आज बोललो

झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच सुचत नव्हते. पण केली हिम्मत. डेस्कजवळ जाऊन हाय म्हणण्यासाठी तोंड उघडले तर आवाजच निघेना. तसाच उभा राहिलो. तीच्या लक्षात आले त्यावेळी तिने हाय केले. मग ‘कंठ फुटला’. आज माझा ‘अवतार’ झालेला. Continue reading

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading

ती कशी असेल?

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते. Continue reading