मुकामार

आता रात्री जेवायला हॉटेलात गेलो होतो. जेवण यायला वेळ लागेल म्हणून तिथला एक वेटर सांगून गेला. खर तर खुपंच भूक लागलेली. माझ्या समोरच्या बाजूच्या एका टेबलवर एक कपल बसलेले. तसे दोघेही छान होते. अंतर फारसे लांब नव्हते. दोघांच्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या. ती मुलगी त्याला सांगत होती की मी तुझा फोटो घरच्यांना दाखवून लगेच डिलीट करील. आणि तोही हसून तीचा आणि त्याचा मोबाईल घेऊन काहीतरी करीत होता. बहुतेक फोटो तीच्या मोबाईलमध्ये पाठवत होता. नंतर मी लक्ष दुसरीकडे दिले तर एक मुलगी फोनवर. खाता खाता तीच्या फोनवर एकदम बारीक आवाजात गप्पा चालू होत्या. हे दोघे फारच गुंग झालेले. मी ऐकायचे टाळून सुद्धा, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. आणि त्यात तो वेटरही लवकर जेवण घेऊन येईना. शेवटी वैतागून मी, तिथून निघून घरी आलो. येतांना दुध आणि आम्रखंड आणले. Continue reading

Advertisements

आमची कार्टी

काय बोलावं अस झालं आहे. दुपारी जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत सहज कंपनीच्या इमारतीला फेरफटका मारीत असतांना, माझा मित्र त्याच्या मुलीच्या इंग्लिश शब्दांबद्दल मोठ्या अभिमानाने सांगत होता. त्याची प्रेमाची गाडी वळून ‘मराठी मिडीयम आणि कॉनवेंट’ यातील फरकावर आली. आणि साहजिकच मराठी मिडीयमचे कसे कच्चे यावर सुद्धा. त्याला तिथेच मी मराठी मिडीयम आणि कॉनवेंट यातील फरक सांगितला. असो, पण खूपच बेकार वाटत आहे. काय कोणाला बोलायचे आता? Continue reading

टोपणनाव

काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. एकाचं नाव ‘काळा’. त्यावर माझा मित्र म्हणाला ‘तो रंगाने खूप काळा आहे म्हणून त्याला गावाकडे सगळे याच नावाने हाका मारतात’. पुढे बघितलं तर, ‘बाजीगर’. आता बाजीगर नाव ह्यासाठी की माझ्या मित्राचे चार मित्र एकाचं मुलीच्या प्रेमात पडले होते. आणि तिला पटवण्यासाठी चौघेही प्रयत्न करत होते. पण ह्याच्या मित्राने नंतर येऊन तिला पटवल. म्हणून त्यावेळी पासून त्या ह्याच्या मित्राला ‘बाजीगर’ असे म्हणायला लागले. काय पण ह्याची फिलॉसॉफी. Continue reading