मना

मी मनाला समजावतो. पण ते माझ ऐकून घेतच नाही. ‘निर्णय’ झाल्याचे मी त्याला सांगतो. पण.. ते माझ हे ऐकताच रुसून बसते. उदास होते. मी त्याला ‘चांदणी’ आयुष्य असल्याचे सांगतो. ते मला चंद्राची कोरीचा हट्ट करते. मी त्याला सांगतो, तो भूतकाळ. ज्यात फक्त अधीरता होती. ज्यात फक्त मी होतो आणि मीच. ते मला त्या सोनेरी क्षणांची आठवण करून देते. त्या सहवासाची, त्या अनमोल मोत्यांची. मी त्याला पुन्हा बोलतो. जाम झापतो. पण ते माझा निर्णय ऐकतच नाही. मला नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडते. मला माझ्या शांततेची कारण विचारते. Continue reading

Advertisements

सगोत्र

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading

संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते. Continue reading

वाचलो!

मागील आठवड्यात वडिलांचा फोन आला होता. पुन्हा एक ‘स्थळ’. झालं! मी काही म्हणायच्या आत वडिलांनी छत्तीस गुण जुळत आहेत. आणि मुलगी देखील दिसायला बरी आहे. मग येत्या रविवारी पहाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता वडिलांना ‘नाही’ कसं बोलणार. ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. तरीच म्हणतोय, गेल्या आठवड्यापासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी का सारखी फडफडते आहे. परवा गेलो घरी. काल सकाळी श्रीरामपूरला पाहण्याचा कार्यक्रम होता. आईने मला तिचा फोटो दाखवला. फोटो बघण्याआधी आईला मी दोन वर्ष थांबता येत नाही का म्हणून वाद घालत होतो. पण तिचा तो फोटो बघितलं आणि वाद आपोआप बंद झाला. यार ती तर अप्सराच्याची पेक्षा सुंदर होती. मग काय गेलो निमुटपणे श्रीरामपूरला. तरीही माझा डाव्या डोळ्याची पापणी एवढी का फडफडते आहे, ते कळत नव्हते. Continue reading

भयकथा

भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात असतांना एका नवीन कामगाराला इतर कामगारांनी त्या चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची गोष्ट सांगितली. त्याने या सगळया खोट्या गोष्टी असतात, भूत वगैरे नसतात. असे त्या बाकीच्या कामगारांना म्हटले. त्यावर त्या कामगारांनी ‘मग हिम्मत असेल तर त्या झाडापाशी रात्रीच्या वेळी जाऊन दाखव’ अशी अट घातली. त्या नवीन कामगाराने देखील ताबडतोप ताबडतोप ती अट स्वीकारली. Continue reading

पांढऱ्या पेशी

आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता झेंडावंदन करणे हे आमचे कर्तव्य. असे आम्ही पांढरपेशी जमात आहोत. आम्ही स्वतःला जगात सर्वात क्षुद्र आहोत, असे समजतो. या शरीरातील लालपेशी खाकी वर्दी घालून आम्हा पांढरपेशीना सतत कायद्याच्या लसी देत असतात. आणि आम्ही ते ऐकतो देखील. कितीही मोठी दुर्घटना घडो. पण आम्ही कायमचं शांत. आता याला आम्ही आमचा पळपुटेपणा किंवा भित्रेपणा न समजता, याला आमचा मोठेपणा समजतो. Continue reading

वडिलांची जागा

आज वडिलांच्या रोजच्या बसण्याच्या जागी बसून बोलत आहे. असो, ही माझी पहिलीच वेळ आहे. काय करणार गावी नेटला रेंजच्या खूप अडचणी आहेत. आता घराबाहेर रेंज मिळते. आणि घरात फक्त पहिल्या खोलीत. वडील ज्या ठिकाणी बसून त्यांची रोजची काम करीत असतात. त्याजागी आणि त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नव्हती. आज प्रसंगच तसा आहे. आणि आई वडील पहिल्याच खोलीत झोपतात. दुसरीकडे बसलो तर माझे पाय त्यांच्या तोंडाच्या दिशेने येतात. म्हणून आज हिम्मत केली आहे. म्हणजे ते अस कधीच जागेवर बसायचं अस म्हणाले नाही. पण या जागेचा दराराच एवढा की, अंगात विजेचा संचार होतो आहे. बोलायचं खूप काही आहे. पण बोटे मनाच्या ताब्यातच राहत नाही आहे. या ओळी लिहायलाच मला दहा पंधरावेळा खाडाखोड करावी लागली. आणि त्यामुळे मनात देखील खुपंच काहूर माजलं आहे. Continue reading