पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?

राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता. Continue reading

Advertisements

दहीहंडी महत्वाची नाही

पुण्यात नेहमी जोरदार साजरी होणारी दहीहंडी, या वेळी मात्र स्वाइन फ्लू आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. ही खरच आनंदाची बाब आहे. दोन दिवस पूर्वी येरवडा पुलाच्या बाजूला दहीहंडी कार्यक्रमाची मोठी मोठी पोस्टर लागली होती. एका पोस्टर वर तर चक्क ५ लाखाचे बक्षिस देण्यात आले होते. परंतु आज सकाळ पासून विविध मंडळ यांचे दहीहंडी रद्द अशी पोस्टर बघून बरे वाटले. दहीहंडी हा आपण खर तर मोठ्या आनंदाने साजरा करणारा उत्सव. जगात कुठेही अस घडत नाही. माणसांचे थरावर थर. आणि बघता बघता एक उंचच्या उंच असा मनोरा बनतो. एक चिमुरडा या सर्वांच्या उंच थरावर पोहचतो आणि उंच बांधलेली दह्याची हंडी फोडतो. हे सगळ अगदी उत्साह वर्धक आणि रोमहर्षक पद्धतीने होत. कधी कधी थर कमी असेल तर हंडी फोड़ता येत नाही. परंतु त्याही वेळी उत्साह तेवढाच असतो. हे सगळे गोविंदा त्याही वेळी नाचतच असतात. आणि पाहणारे आनंद लूटत असतात. Continue reading

नितेश राणे यांचा स्वाभिमान

२ ऑगस्टला पुण्यात स्वाभिमान संघटनेच्या ३१ शाखांचे उद्घाटन झाले. मी कुठे कधी उद्घाटन झाले हे मला कळले  नाही. पण ठिकठिकाणी लावलेली भित्तिपत्रके बघून समजले. आज माझा बोपोडी मधील मित्र सांगत होता की आमच्या इथे नितेश राणे आला होता. तो म्हणाला त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी नारायण राणे सारखी आहे. नितेश राणे काय म्हटला अस मी माझ्या मित्राला विचारल तर तो बोलला की ‘तुम्ही कोठेही आणि काहीही करा तुमच्यावर केस होणार नाही’. Continue reading