टीसी

आज सकाळी लोकल चुकली. येताना लोकल वेळेवर आली. पण नेहमीप्रमाणे उशिरा निघाली. पुणे स्टेशन वरून निघायची वेळ सातची आणि निघाली सव्वा सातला. मी नेहमी येताना शेवटून दुसऱ्या डब्याच्या पहिल्या गेटवर असतो. महिन्याच्या अखेरच्या काही दिवस टीसी (तिकीट चेकर) आमच्या डब्यात तिकीट चेक करायला नक्की येतो. आता नक्की यासाठी म्हणतो कारण मी त्या डब्यात रोज असल्याने मला पक्क माहित झाल आहे. आणि कोण कोण टीसी आहे हे देखील माहित झाल आहे. त्यातील एक पंजाबी टीसी आहे. तो नेहमी डब्यात येत असतो. गोल चेहरा आणि चेहऱ्याप्रमाणेच शरीरयष्टी, पण धष्टपुष्ट.काळा रंगाचा कोट, भरदार दाढी- मिश्या आणि डोक्यावर पगडी. खर तर त्याच वर्णन करावा असाच आहे तो. एक वर्षापासून त्याला मी बघतो आहे. अनेक वेळा माझा लोकलचा पास चेक केला आहे. पण कधी बोलण वगैरे झाल नाही. Continue reading

Advertisements

अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. Continue reading

गैरसमज

आज संध्याकाळची ५:३० ची शिवाजीनगरहून लोणावळा लोकल पकडली. लोकल चिंचवडला आली. लोकल चिंचवडहून ज्यावेळी निघाली त्यावेळी माझ्या पुढच्या डब्यातील एका गेट वीराने एका मुलीचा स्क्राफ ओढला. ती फारच लोकलच्या जवळ असल्याने त्याचा सहज हात पोहचला होता. गाडीने वेग घेतला. तिचा स्कार्फ बरोबर तिची ओढणीसुद्धा ओढली गेली. ते बघून माझ खर तर काही संबंध नव्हता. पण तरीदेखील तिळपापड झाला. दोन सेकंदासाठी त्या गेट बहाद्दराला शिवी द्यावी अस मनात आल. माझ्या डब्यातील एक जण म्हणाला आजकाल मुल फार मुलींची छेड काढत असतात. खर तर अशी मुलींची छेडाछेडी मी मुंबईला असताना देखील कधी बघितली नव्हती. पुण्यात मुलींना शिट्ट्या मारतात हे बघितलं होत. पण अस अंगावर हात टाकण, पहील्यांदीच बघितलं. मी तो कोण आहे हे बघायचा प्रयत्न करीत होतो. पण तो कोण हे दिसतच नव्हत. माझ्या डब्यातील थंड प्रतिक्रिया बघून माझा खूपच त्रागा होत होता. विचार केला कि पुढच्या स्टेशनाला त्याला गाठायचं. Continue reading

नगरचे रस्त्यातले खड्डे

परवा मी आमच्या गणेश मंदिरातील दर वर्षी होणारा भंडारासाठी गावी गेलो. माझ गाव वांबोरी. वांबोरी नगर पासून पुढे २५ किलोमीटर. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवाजीनगर हुन नगर बस पकडली. त्याच बस मध्ये माझा एक जुना मित्र भेटला. त्याच्या म्हणण्यावरून मी रांजणगावचे तिकीट काढले. तो म्हणाला कि रांजणगावपासून आपण दुचाकीवरून जावू. खर तर मला निघायला खूप उशीर झाला होता. म्हटलं कि दुचाकीवरून लवकर पोहचू. म्हणून मी त्याला हो म्हटलं. पण नशिबात काही लवकर पोहचण नव्हत. त्याचा मित्र भेटला. मग त्याच्या पुढे आम्ही निघून नगरला पोहचेपर्यंत दोन वाजून गेले. Continue reading