नशीब

ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन! Continue reading

Advertisements

विषय

वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो. Continue reading

गाडी चालली

कालचा दिवस, काय बोलू आणि काय नाही अस झाले आहे. काल ‘बोललो’ म्हणण्या इतके बोललो. सकाळी कॅन्टीनमध्ये मला ती दिसली. पण बोलण्याची हिम्मतच होईना. दुपारपर्यंत असेच. शेवटी कंपनीतून निघण्याची वेळ आली. माझे झालेल्या कामाचा इमेल मी माझ्या सहकारीला केला. आणि थोड्या वेळाने मेल मिळाला का म्हणून त्या सहकारीकडे गेलो. तर ती, त्यावर चर्चा करीत बसली. शेवटी तिला माझी पाचची बस आहे अस म्हणून निघालो. जातांना ‘अप्सरा’ डेस्कपासून गेलो. तर ती होती डेस्कवर. माझ्या डेस्कवर जाऊन तो संगणक झटपट बंद केला. आणि पुन्हा व्हायचं तेच! हिम्मतच होईना. तीच्या डेस्कजवळ जायची. पण मग वेळच नव्हता. चार वाजून पन्नास मिनिटे झालेली. तसाच निघालो. आणि तीच्या डेस्क जवळ जाऊन तिला ‘बाय’ म्हटलं. Continue reading

सख्खे

आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून चहा प्यायला जाऊयात म्हणून त्याचा आग्रह. बर, मी पण त्यावेळी वेडाच! लगेचंच. मग चहाच्या टपरीवर गेलो की, तो मला ‘दोन रुपये सुट्टे आहे का?’ अस विचारणार. मी बसने जा ये करायचो. त्यामुळे सुट्टे पैसे असायचे. आई वडिलांनी थोडे फार तरी खोटे बोलायला शिकवले असते तर किती बरे झाले असते. मी पैसे काढून द्यायचो. आणि त्याची तो एक सिगारेट खरेदी करायचा. Continue reading

पासवर्ड

आता इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न केला होता. पण युझर नेमचे झंझटमुळे शेवटी सोडून द्यावी लागली. Continue reading

वशिला

कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. मी तुझ्याकडे राहतो. कारण पैश्यांचा अडचण आहे. आणि तूच तुझ्या कंपनीत माझ्यासाठी जॉब बघ’. कसाबसा पिच्छा सोडवला. Continue reading

लयलूट

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ड्राईव्ह. त्यामुळे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर घ्यावा लागला. मित्राला त्या एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत विचारली तर तो बोलला की अंदाजे दोन हजारापर्यंत जाईल. चिंचवड स्टेशनला डेटा केअर सेंटरमध्ये गेलो. तिथे जाऊन चौकशी केली तर त्यांनी सॅमसंग एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत चार हजार दोनशे सांगितली. Continue reading